रत्नागिरीमहिला मोर्चा जिल्हाध्यक्ष सौ वर्षा परशुराम ढेकणे तसेच शहराध्यक्ष श्री.दादा ढेकणे यांनी...

महिला मोर्चा जिल्हाध्यक्ष सौ वर्षा परशुराम ढेकणे तसेच शहराध्यक्ष श्री.दादा ढेकणे यांनी घेतली सर्पदंशाने मृत्यू झालेल्या कंत्राटी कर्मचाऱ्याच्या कुटुंबाची सांत्वनपर भेट

महिला मोर्चा जिल्हाध्यक्ष सौ वर्षा परशुराम ढेकणे तसेच शहराध्यक्ष श्री.दादा ढेकणे यांनी घेतली सर्पदंशाने मृत्यू झालेल्या कंत्राटी कर्मचाऱ्याच्या कुटुंबाची सांत्वनपर भेट; भाजपकडून ₹५ लाखांची तातडीची मदत

रत्नागिरी नगर परिषदेच्या उद्यान विभागात कंत्राटी कर्मचारी म्हणून कार्यरत असलेले काशीनाथ गोताड (रा. फगर वठार) यांचे सर्पदंशामुळे दुर्दैवी निधन झाल्याची घटना अत्यंत वेदनादायी असून त्यांच्या निधनाने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.गोगटे-जोगळेकर महाविद्यालयाजवळ माडाच्या झापांची साफसफाई करत असताना त्यांना सर्पदंश झाला होता.

त्यानंतर त्यांच्यावर रत्नागिरी जिल्हा शासकीय रुग्णालयात उपचार सुरू होते. मात्र उपचारादरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली. त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगा व मुलगी असा परिवार आहे.

या दुःखद घटनेची माहिती मिळताच भाजप महिला मोर्चा जिल्हाध्यक्ष सौ. वर्षा परशुराम ढेकणे तसेच भाजप रत्नागिरी शहराध्यक्ष परशुराम (दादा) ढेकणे यांनी तात्काळ त्यांनी या घटनेची माहिती भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष मा. रवींद्र चव्हाण यांना दिली. या दुःखद घटनेची दखल घेत मा. रवींद्र चव्हाण यांनी तातडीने संबंधित कुटुंबाला सर्वतोपरी मदत करण्याच्या सूचना दिल्या. त्यानुसार भारतीय जनता पार्टीच्या वतीने ₹ ५ लाखांची आर्थिक मदत उपलब्ध करून देण्यात आली.

यावेळी सौ. वर्षा ढेकणे यांनी दिवंगत काशीनाथ गोताड यांच्या पत्नींना धीर देत या कठीण प्रसंगी भारतीय जनता पार्टी आपल्या कुटुंबाच्या पाठीशी खंबीरपणे उभी आहे.

भविष्यात कोणत्याही प्रकारची शैक्षणिक गरज भासल्यास निःसंकोच कळवा. पक्षाच्या माध्यमातून शक्य ती सर्व मदत करण्यासाठी आम्ही सदैव प्रयत्नशील राहू असे आश्वासन दिले.

या प्रसंगी नगरसेवक नितीन जाधव, राजू तोडणकर, मानसी करमरकर, सुप्रिया रसाळ, उपनगराध्यक्ष समीर तिवरेकर, भाजप जिल्हा सरचिटणीस नुपूर मुळे, महिला मोर्चा शहराध्यक्ष भक्ती दळी तसेच भाजपचे पदाधिकारी व कार्यकर्ते संदीप सुर्वे, शमी हरचेकर, शोभा जिरोळे, राकेश सुवरे, संदीप रसाळ, सचिन करमरकर, संतोष सावंत आदी उपस्थित होते.
दिवंगत काशीनाथ गोताड यांच्या कुटुंबीयांना धीर देत त्यांच्या पाठीशी कायम उभे राहण्याचा विश्वास यावेळी सर्व उपस्थितांनी व्यक्त केला.

सामाजिक बांधिलकी जपत संकटग्रस्त कुटुंबाला तातडीने मदतीचा हात देत भारतीय जनता पार्टीने संवेदनशीलतेचा परिचय दिल्याची भावना उपस्थितांनी व्यक्त केली.

Breaking News

Metode de Depunere la Cazinou Bet365

În căutarea celor mai flexibile modalități de a investi...

Καταθέσεις στο καζίνο WinShark: Οδηγός

Πολλοί παίκτες προτιμούν να χρησιμοποιούν το casino-winshark.gr για τις...