रत्नागिरी, :- माहे फेब्रुवारी 2026 चा जिल्हास्तरीय महिला लोकशाही दिन 16 फेब्रुवारी 2026 रोजी सकाळी 11 ते दुपारी 1 वाजता जिल्हाधिकारी कार्यालय सभागृहात आयोजित करण्यात आला आहे, असे जिल्हा महिला व बालविकास अधिकारी तथा सदस्य सचिव, जिल्हास्तरीय महिला लोकशाही दिन समिती यांनी कळविले आहे. जिल्हास्तरावर दर महिन्याला तिसऱ्या सोमवारी जिल्हास्तरीय महिला लोकशाही दिन साजरा होतो. यावेळी अर्जदार महिला स्वतः उपस्थित राहून त्यांच्या तक्रारींच्या अनुषंगाने निवेदन सादर करतात व त्यानुसार जिल्हा स्तरावरील संबंधित अधिकारी यांना महिलांचे वैयक्तिक प्रश्नांच्या कार्यवाहीबाबत निर्देश देण्यात येतात.
© Copyright - Konkan24News. Website Design, Development & Maintain by SM Media. +91 96047 60330.
