रत्नागिरीमहिला शक्तीचा स्वाभिमान जपण्यासाठी मुंबईत जनआक्रोश महिला संमेलन उत्साहात संपन्न

महिला शक्तीचा स्वाभिमान जपण्यासाठी मुंबईत जनआक्रोश महिला संमेलन उत्साहात संपन्न

महिला शक्तीचा स्वाभिमान जपण्यासाठी मुंबईत जनआक्रोश महिला संमेलन उत्साहात संपन्न

👉महिला शक्तीचा स्वाभिमान अबाधित ठेवण्यासाठी आणि विरोधकांकडून झालेल्या अपमानाचा निषेध करण्यासाठी मुंबई येथे भव्य जन आक्रोश महिला संमेलन उत्साहात पार पडले.
देशाचे पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी , राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस प्रदेश अध्यक्ष रवींद्र चव्हाण तसेच महिला प्रदेश अध्यक्ष चित्रा वाघ यांच्या नेतृत्वात
या संमेलनासाठी रत्नागिरी जिल्ह्यातून महिला मोर्चा दक्षिणच्या जिल्हाध्यक्ष सौ. वर्षा परशुराम ढेकणे यांच्या महिला मोर्चाच्या पदाधिकाऱ्यांनी मुंबईत उपस्थिती लावली. यावेळी सौं. वर्षा ताई ढेकणे, सौं. नुपुरा मुळ्ये, सौं. सुप्रिया रसाळ, सौं. अनघा साळवी,सौं. रुपाली कदम, सौं भक्ती दळी, सौं. संगीता कवितके,
सौं. शितल रानडे, सौं. रसिका देवळेकर, सौं. रुपाली दांडेकर, सौं. अंजली कदम, सौं. वैशाली निमकर, सौं. अदिती गुडेकर, सौं. दीप्ती महाडिक, सौं. श्वेता शिंदे, सौं. प्रज्ञा टाकळे, सौ. नंदिनी शेट्ये आदी महिला उपस्थित होत्या.
महिलांच्या हक्कांबाबत जागरूकता निर्माण करणे, त्यांचा सन्मान राखणे आणि अन्यायाविरोधात एकजूट दाखवणे हा या संमेलनाचा मुख्य उद्देश होता.
यावेळी उपस्थित महिलांनी एकमुखाने महिलांवर होणाऱ्या अन्यायाचा तीव्र निषेध करत “महिला सन्मानासाठी संघर्ष कायम राहील” असा निर्धार व्यक्त केला. तसेच केंद्र राज्य सरकार महिलासक्षमीकरणासाठी सातत्याने प्रयत्नशील असल्याचा विश्वासही व्यक्त करण्यात आला.

Breaking News

शेतकऱ्यांवर आली टँकर ने शेतात पाणी मारण्याची वेळ

शेतकऱ्यांवर आली टँकर ने शेतात पाणी मारण्याची वेळ --...

गणपतीपुळे येथे पर्यटनासाठी आलेले संभाजीनगरचे ५ जण समुद्रात बुडाले, शोधकार्य सुरू

गणपतीपुळे येथे पर्यटनासाठी आलेले संभाजीनगरचे ५ जण समुद्रात बुडाले,...