रत्नागिरी, : माजी सैनिक / माजी सैनिक विधवा /विर नारी / विर माता/विर पिता यांच्या अडिअडचणी सोडविण्यासाठी जिल्हा सैनिक कल्याण कार्यालयामार्फत खेड आणि चिपळूण येथे कल्याण संघटक यांचे माहे फेब्रुवारी २०२६ मध्ये दौऱ्याचे आयोजन करण्यात आल्याचे जिल्हा सैनिक कल्याण अधिकाऱ्यांनी कळविले आहे.
सोमवार दि.२ फेब्रुवारी रोजी सैनिकी मुलांचे वसतिगृह, खेड आणि मंगळवार दि. ३ फेब्रुवारी रोजी सैनिकी मुलांचे वसतिगृह, चिपळूण येथे कल्याण संघटक राहुल काटे हे दौऱ्यावर असणार आहेत. सोमवार दि. ९ फेब्रुवारी रोजी सैनिकी मुलांचे वसतिगृह, खेड आणि मंगळवार दि.१० फेब्रुवारी रोजी सैनिकी मुलांचे वसतिगृह, चिपळूण तसेच बुधवार दि. ११ फेब्रुवारी रोजी भोसले प्लाजा, मंडणगड येथे अ.शा. कल्याण संघटक सुनिल कदम यांचा दौरा असेल. सोमवार दि. १६ फेब्रुवारी रोजी सैनिकी मुलांचे वसतिगृह, खेड आणि मंगळवार दि. १७ फेब्रुवारी रोजी सैनिकी मुलांचे वसतिगृह, चिपळूण येथे कल्याण संघटक अनिल मोरबाळे हे दौऱ्यावर असणार आहेत. सोमवार दि. २३ फेब्रुवारी रोजी सैनिकी मुलांचे वसतिगृह, खेड आणि मंगळवार दि. २४ फेब्रुवारी रोजी सैनिकी मुलांचे वसतिगृह, चिपळूण येथे अ.शा.कल्याण संघटक सुनिल कदम हे दौऱ्यावर असणार आहेत.
या दौऱ्यामध्ये अभिलेख कार्यालय विषयक, पेन्शन विषयक, महासैनिक पोर्टलवर रजिस्ट्रेशन (नोदणी) तसेच इतर अडचणी सोडविण्यात येतील. मेळाव्यात येताना आपल्या सोबत www.mahsainik.maharashtra.gov.in वेब साइट वर रजिस्ट्रेशन केलेली पावती, डीस्चार्ज पुस्तक, पी.पी.ओ. ची प्रत, आधार कार्ड, पॅन कार्ड, बँकेचे पासबुक, इ.सी.एच.एस. कार्ड व आधार कार्डशी लिंक असलेला मोबाईल फोन इ. कागदपत्रे सोबत आणावे व सेवेचा लाभ घ्यावा, असे आवाहन करण्यात येत आहे.
000
