=====——=======
देवरुख :- मातृमंदिर संस्थेचे पशुसंवर्धन पदवीका विद्यालयाच्या पहिल्या बùचचा पदवीका परिक्षेचा निकाल जाहिर झाला असून मातृमंदिर पदवीका अखेरच्या वर्षातील सर्व विद्यार्थी उत्तम मार्काने उत्तीर्ण होत १०० टक्के यशस्वी झाले आहेत.
मातृमंदिरच्या पशुसंवर्धन डेअरी या जिल्ह्यातील पहिल्या पदवीका परिक्षेत सर्वोत्तम मार्क मिळवित नागपूर म्हापसू विद्यापीठात यशस्वी होत संस्थचे नाव उज्वल केले आहे. संस्थेचे कार्याध्यक्ष अभिजित हेगशेट्ये यांनी या मुलांचे आणि सर्व स्टाफचे विशेष अभिनंदन केले आहे.
नागपूरच्या म्हापसू विद्यापीठाशी सलग्न मातृमंदिर पशुसंवर्धन पदवीका अभयासक्रम २०२३-२४ साली प्रथमच रत्नागिरी जिल्ह्यात देवरुख येथे सुरु झाला. रत्नागिरी जिल्ह्यात कृषी सलग्न दुग्धोत्पादन , पशु संवर्धन या संदर्भात प्रशिक्षण देणारी कोणतीच शैक्षणिक सुविधा उपलब्ध नव्हती. या काळात मातृमंदिर या सामाजिक संस्थेने दुरदृष्टीचा विचार करत नागपूर विद्यापीठाशी सलग्न असणारा हा पदवी अभयासक्रम सुरु केला. मातृमंदिरच्या ओझरे फार्मवर २४ एकर प्रशस्त जागेत ही शैक्षणिक सुविधा उपलब्ध आहे. प्रशस्त गोठा अत्यंत उच्च प्रतिची जातीवंत जनावरे, शेळ्या कुक्कुट पालन युनिट, अद्यावत लùबरोटरीज आणि तज्ञ प्राध्यापकवर्ग यामुळे या पदवीका अभयासक्रमाला प्रवेश घेण्यासाठी विद्याथ्यांची झूंबड होत आहे.
आज एलएमडीपी पदवीका पास विद्यार्थ्यांसाठी नोकरीच्या अभूतपुर्व संधी उपलब्ध आहेत. शासनाच्या पातळीवर आज जिल्हा आणि तालूक्याला जागा रिक्त आहेत. डेरी डेव्हलपमेंट या उद्योग जगतात मोठ्या प्रमाणात या मुलांना अत्यंत उत्तम पगाराची नोकरी मिळत आहे.
मातृमंदिर एलएमडीपी पदवी परिक्षा पास होणार्या विद्यार्थ्यात गौरव शामसुंदर कदम, कोमल सुभाष धावडे, राहू वेल्ये, निधी मेस्त्री, रोहित नटे या मुलांनी प्रथम वर्गात उत्तम मार्क मिळवित यश संपादन केले आहे. संस्थेचे अध्यक्ष मेघना चाळके आणि संचालकमंडलांनी त्यांचे विशेष कौतूक केले आहे.
जिल्ह्यातील या पहिल्या पदवीका कॅालेज संदर्भात बोलतांना कार्याध्यक्ष अभिजित हेगशेट्ये यांनी सांगितले की, मातृमंदिरने या शिक्षणाची सुवर्ण संधी रत्नागिरी जिल्ंयातील मुलांना उपलब्ध करुन दिली आहे। त्यासाठी रहाण्याची सुविधा मोफत आहे तर सर्व शासकीय स्काùलरशीप सवलतीच्या माध्यमातून जवळपास मोफत शिक्षण उपलब्ध आहे. या संधीचा लाभ कोकणातील मुलांनी घेणे आवश्यक आहे.
आज बारामती, निफाड, कोल्हापूर, सिंधुदुर्ग येथील मुले येथे राहून शिक्षण घेत आहेत रत्नागिरी जिल्ह्यातील मुलांनी या उच्च् कौशल्याधारीत शिक्षणापासून दूर राहू नये असे आवाहन केले आहे. यासाठी महाविद्यालय स्टाफ वैभव आरडे 7741929141 आणि विनोद वाडकर 9423293072 यांचेशी संपर्क करावा असे आवाहन संस्थेतर्फे करण्यात आले आहे.
