रत्नागिरीमाय भारत पोर्टलचा लाभ युवकांनी घ्यावा- निवासी उपजिल्हाधिकारी चंद्रकांत सूर्यवंशी

माय भारत पोर्टलचा लाभ युवकांनी घ्यावा- निवासी उपजिल्हाधिकारी चंद्रकांत सूर्यवंशी

माय भारत पोर्टलचा लाभ युवकांनी घ्यावा
– निवासी उपजिल्हाधिकारी चंद्रकांत सूर्यवंशी
रत्नागिरी, (जिमाका):- माय भारत युवा कार्यक्रम तथा क्रीडा मंत्रालय भारत सरकारच्या माय भारत या पोर्टलचा जिल्ह्यातील युवकांनी लाभ घ्यावा, असे आवाहन निवासी उपजिल्हाधिकारी चंद्रकांत सूर्यवंशी यांनी केले.
माय भारत जिल्हास्तरीय सल्लागार समितीची बैठक जिल्हाधिकारी कार्यालयातील सभागृहात  झाली. जिल्हा युवा समन्वयक स्वप्निल देशमुख यांनी संगणकीय सादरीकरण करुन सविस्तर माहिती दिली.
निवासी उपजिल्हाधिकारी श्री. सूर्यवंशी म्हणाले, युवकांना प्रगल्भ करणे, त्यांना विकसित करणे त्यासाठी माय भारत हा एक प्लॅटफॉर्म आहे. विधायक कामकाजासाठी समाजात सकारात्मक संदेश पोहोचविण्यासाठी सर्वांनी याचा वापर करुया. शासकीय कार्यक्रमामध्ये स्वयंस्फूर्तीने सहभाग हवा यासाठी माय भारत चा सुयोग्य पध्दतीने सर्वांनी वापर करावा. जनजागृतीसाठी विशेष मोहिम राबविण्यासाठी माय भारतचे सहकार्य घ्यावे. बैठकीला अग्रणी जिल्हा व्यवस्थापक दर्शन कानसे, जिल्हा उद्योग केंद्राचे संकेत कदम, जिल्हा क्रीडा अधिकारी विजय शिंदे आदी उपस्थित होते.

Breaking News

अंजनारीत शिवसेनेला बळ; आजी-माजी सरपंचांसह अनेक ग्रामस्थांचा शिवसेना पक्षात प्रवेश

💥अंजनारीत शिवसेनेला बळ; आजी-माजी सरपंचांसह अनेक ग्रामस्थांचा शिवसेना पक्षात...

रत्नागिरी येथे काढण्यात आलेल्या तिरंगा रॅलीत नागरिक झाले मोठ्या प्रमाणात सहभागी

रत्नागिरी येथे काढण्यात आलेल्या तिरंगा रॅलीत नागरिक झाले मोठ्या...