मंगळवारी ही बोट मुंबईच्या भाऊंचा धक्का येथून सकाळी निघाली आणि दुपारी रत्नागिरी तालुक्यातील जयगड बंदरात दाखल झाली.त्या नंतर ही बोट पुढे जयगड कडे रवाना झाली..सदरची चाचणी यशस्वी झाली असल्याचे सांगितले गेले असले तरी त्याची अधिकृत घोषणा कधी केली जाईल याकडे कोकणवासियांचे लक्ष लागून राहिले आहे.तब्बल 35 वर्षानंतर मुंबई रत्नागिरी सिंधुदुर्ग बोट सेवा सुरू होत असल्याने कोकणवासीयात आनंदाचे वातावरण पसरले आहे
मुंबई जयगड ते सिंधुदुर्गच्या विजयदुर्ग दरम्यान चालणाऱ्या एम.टु एम या अत्याधुनिक फेरी बोटीची चाचणी यशस्वी झाली असल्याने आता सदरची नियमित सेवा 15 सप्टेंबर पासून सुरु होण्याचे संकेत मिळाले आहेत
