रत्नागिरीमुंबई येथे महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ (MIDC) ची संचालक मंडळ बैठक राज्याचे...

मुंबई येथे महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ (MIDC) ची संचालक मंडळ बैठक राज्याचे उद्योग व मराठी भाषा मंत्री ना. डॉ उदय सामंत ह्यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली.

या बैठकीदरम्यान ना. उदयजी सामंत ह्यांनी MIDC संदर्भातील विविध महत्त्वपूर्ण मुद्द्यांवर सविस्तर चर्चा केली तसेच राज्यातील औद्योगिक प्रगतीचा वेग वाढवण्यासाठी खालील विषयांवर सखोल आढावा घेतला. राज्यभरात होत असलेल्या गुंतवणुकीची सद्यस्थिती आणि भावी योजना तसेच नवउद्योजकांसाठी उपलब्ध असलेल्या विविध शासकीय योजनांचा आढावा घेतला 

औद्योगिक क्षेत्राच्या सर्वांगीण विकासासाठी आवश्यक धोरणात्मक निर्णय या बैठकीत घेतले. महाराष्ट्राच्या औद्योगिक प्रगतीला अधिक वेग मिळावा आणि रोजगार निर्मितीच्या संधी वाढाव्यात या उद्दिष्टाने ही बैठक फलदायी ठरली. राज्यात उद्योग क्षेत्राचा विकास आणि रोजगारनिर्मिती अधिक वेगाने घडवून आणण्यासाठी सरकार कटिबद्ध असून, उद्योगधंद्यांना प्रोत्साहन देण्यासाठी विविध उपक्रम राबवले जात असल्याचे ना. उदयजी सामंत ह्यांनी म्हटले.

या प्रसंगी उद्योग विभाग सचिव डॉ. पी. अन्बलगन, मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. पी. वेलरासू, सह मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. कुणाल खे्मनर, सह मुख्य कार्यकारी अधिकारी (विशेष प्रकल्प) डॉ. विजय राठोड आदी संचालक, सदस्य उपस्थित होते.

Breaking News