अनुदानाच्या निधी संदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी 970 कोटी रुपयाचा निधी उपलब्ध करून दिला, त्याबद्दल त्यांचे आभार मानले व त्रुटी पूर्तता केलेल्या शिक्षकांना समान मानवी वाढीव टप्पा द्यावा अशी विनंती केली,*
एक ऑगस्ट 2025 पासून 970 कोटी रुपये निधी वाटपाचा शासन आदेश काढण्यासाठी अधिकाऱ्यांना आदेश द्यावेत अशी विनंती आमदार ज्ञानेश्वर म्हात्रे यांनी केली केली, लवकरच आदेश पारित होईल असे मुख्यमंत्री साहेबांनी सांगितले
डोंगराळ,आदिवासी भागातील विद्यार्थी संख्या कमी झाली आहे त्याचा परिणाम शाळांवर व संच मान्यतेवर होत आहे, त्यांचे निकष बदलावेत
एक नोव्हेंबर 2005 पूर्वी विनाअनुदानित व अंशतः अनुदानित शिक्षक- शिक्षकेतरांना जुनी पेन्शन मिळावी*
शिक्षण विभागातील कामांमध्ये होत असलेली अनियमितता.
पेसा अंतर्गत जिल्ह्यातील शाळांना रोस्टर तपासणी करता येत नाही म्हणून पवित्र पोर्टल ने शिक्षकांची भरती करता येत नाही, मार्ग काढावा. समितीचा आदेश आलेला आहे लवकरच रोस्टर तपासणी करून मिळेल असे मुख्यमंत्री साहेबांनी सांगितले*
कोकण विभाग मतदार संघात यूपीएससी, एमपीएससी सेंटर व ग्रंथालय उपलब्ध करून द्यावेत, कोकणातील सर्व शाळांना वीज मुक्त करण्यासाठी सोलर पॅनल मिळावेत ,आमदार फंडातून 10 कोटी चा निधी कोकण विभागातील सर्व अनुदानित, व अंशतः अनुदानित माध्यमिक शाळा डिजिटल करण्यासाठी वापरला तसेच, न पा शाळांसाठी जिल्हा नियोजन फंडातून 2 कोटी रुपये उपलब्ध करून शाळा डिटेल केल्या तसेच तात्कालीन पालकमंत्री आदरणीय श्री रवींद्र चव्हाण साहेब यांच्या प्रयत्नातून सिंधुदुर्ग व पालघर जिल्ह्यासाठी 4 कोटी चे सोलर पॅनल उपलब्ध करून दिल्याची माहिती माननीय मुख्यमंत्र्यांना साहेबांना दिली, त्यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांनी आमदार ज्ञानेश्वर म्हात्रे सर यांचे कौतुक केले*
वर्ल्ड कप विजेत्या खेळाडू व प्रशिक्षकांना बक्षिसाची रक्कम व शासकीय सेवेत दर्जा एकची नोकरी मिळावी*
इत्यादी विषयांवर माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांच्याशी चर्चा केली, संबंधित खात्याच्या मंत्र्यांना लगेच आदेश देतो असे सांगितले*
सभे दरम्यान भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष आदरणीय आमदार श्री रवींद्र चव्हाण साहेब, महसूल मंत्री आदरणीय श्री चंद्रशेखर बावनकुळे साहेब, मत्स्य उत्पादन मंत्री आदरणीय नितेशजी राणे साहेब , कोकणातील सर्व आमदार उपस्थित होते*
—
मुख्यमंत्री ना. श्री. देवेंद्र फडणवीस यांची आमदार ज्ञानेश्वर म्हात्रे यांनी भेट घेत केली विविध विषयांवर चर्चा
