रत्नागिरीमॉडेल स्कुल मध्ये इंग्लिश स्पिकिंग कोर्सला सुरवात-

मॉडेल स्कुल मध्ये इंग्लिश स्पिकिंग कोर्सला सुरवात-

रत्नागिरी तालुक्यातील दि मॉडेल इंग्लिश स्कुल सैतवडे प्रशालेत इंग्लिश स्पिकिंग कोर्सला चांगला प्रतिसाद मिळाला आहे. संस्थेने काही शिक्षणप्रेमी लोकांच्या माध्यमातून सोळा संगणक शाळेला उपलब्ध करून दिले. तसेच शाळेत एक आय सी टी ची एक दर्जेदार खोली तयार करून दिली.प्रशालेचे उत्साही कर्मचारी श्री रुमान पारेख हे विद्यार्थ्यांना इंग्लिश स्पिकिंग कोर्स बरोबर आय टी.कोर्सेचे शिक्षण देत आहेत. विद्यार्थीही आवडीने संगणक हाताळत सदर कोर्सेस पुर्ण करीत आहेत… सैतवडे येथील दि मॉडेल इंग्लिश स्कूल ही एक प्रसिद्ध आणि लोकप्रिय हायस्कुल असुन या ठिकाणी विद्यार्थ्यांना उत्तम प्रकारचे शिक्षण दिले जाते तसेच या हायस्कूल चा दहावीचा निकाल नेहमीच चांगला राहिला असल्याने या ठिकाणी पंचक्रोशीतील विद्यार्थी ऍडमिशन घेण्यासाठी नेहमीच प्राधान्य देतात असे दिसून आले आहे..

Breaking News