रत्नागिरीरत्नागिरी जिल्हा तीव्र पाणी टंचाईला सामोरे जात असताना नवीन विंधन विहिरींची निर्मिती...

रत्नागिरी जिल्हा तीव्र पाणी टंचाईला सामोरे जात असताना नवीन विंधन विहिरींची निर्मिती करण्यापेक्षा हजारो हातपंप/विद्युत पंप (बोअर वेल) हे नादुरूस्त अवस्थेत असून खाजगी ठेकेदारांना दिला जाणारा अवाढव्य देखभाल खर्च तात्काळ थांबवून त्याचा भार जिल्हा परिषदेच्या कंत्राटी कामगारांना देण्यात यावा या मागणी साठी आज मनसे रत्नागिरी तालुका अध्यक्ष श्री रुपेश जाधव यांनी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीम. वैदेही रानडे यांची भेट घेऊन निवेदन दिले

रत्नागिरी जिल्हा तीव्र पाणी टंचाईला सामोरे जात असताना नवीन विंधन विहिरींची निर्मिती करण्यापेक्षा हजारो हातपंप/विद्युत पंप (बोअर वेल) हे नादुरूस्त अवस्थेत असून खाजगी ठेकेदारांना दिला जाणारा अवाढव्य देखभाल खर्च तात्काळ थांबवून त्याचा भार जिल्हा परिषदेच्या कंत्राटी कामगारांना देण्यात यावा या मागणी साठी आज मनसे रत्नागिरी तालुका अध्यक्ष श्री रुपेश जाधव यांनी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीम. वैदेही रानडे यांची भेट घेऊन निवेदन दिले.
या निवेदनात महाराष्ट्र नवनिर्माण सेना रत्नागिरीच्या वतीने प्रशासनाला निर्दशनास आणून देण्यात आले आहे की संपूर्ण रत्नागिरी जिल्हा तीव्र पाणी टंचाईला सामोरे जात असताना हजारो हातपंप/विद्युत पंप (बोअर वेल) हे नादुरूस्त अवस्थेत असून त्याचा अवाढव्य देखभाल खर्च खाजगी ठेकेदारांना दिला जात असून तो तात्काळ थांबवून त्याचा भार पूर्ववत जिल्हा परिषदेच्या कंत्राटी कामगारांना देण्यात यावा..सन २०२२ पर्यंत ही व्यवस्था जिल्हा परिषद अंतर्गत कंत्राटी कामगारांच्या माध्यमातून अल्प वेतनावर चालू असताना ती अवाढव्य दराने खाजगी ठेकेदारांना का दिली गेली याची सखोल चौकशी करून त्यावर कारवाई करणे अत्यावश्यक आहे. खाजगी ठेकेदारांकडून या हजारो हातपंपाचा देखभाल खर्च हा जनतेच्या पैश्याचा अपव्यय असून तो तत्काळ बंद करण्यात यावा तसेच याकामी सक्षमतेने काम करणाऱ्या कंत्राटी कामगारांना सेवेत घेऊन ही व्यवस्था सुधारण्यात यावी जेणेकरून तीव्र पाणी टंचाईला सामोरे जाणाऱ्या सामान्य जनतेला दिलासा मिळेल . भूजल पातळी दिवसेंदिवस खालावत जात असताना नवीन विंधन विहिरी (बोअरवेल) निर्मिती धोकादायक असून सद्यस्थितीतील हजारो हातपंप /विद्युत पंप सक्षमतेने कार्यरत कसे राहतील याविषयी जिल्हा परिषद प्रशासनाने उपाययोजना कराव्यात अशी स्पष्ट व आग्रही मागणी मनसेने केली आहे आहे . याचबरोबर अनेक ग्रामपंचायती खाजगी ठेकेदारांची अवाढव्य देखभाल खर्च अदा करण्यात सक्षम नाहीत त्यांना जिल्हा परिषदेच्या स्वतःच्या यांत्रिकी देखभाल करणाऱ्या मनुष्यबळाकडून सेवा प्राप्त झाल्यास त्यांनादेखील कायमस्वरूपी दिलासा मिळेल.. एकंदरीत या विषयाचे गांभीर्य लक्षात घेऊन जिल्हा परिषद प्रशासनाने तत्काळ कारवाई करावी यासाठी आपण जातीने लक्ष घालू असे आश्वासन जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीम. वैदेही रानडे यांनी मनसेच्या शिष्ट मंडळाला दिले आहे.

याप्रसंगी मनसे तालुका अध्यक्ष श्री रुपेश जाधव , श्री. तेजस नागवेकर, सर्वेश जाधव, रोहन शेलार, स्वप्नील नागवेकर, आशिष फुटक आदी मनसे पदाधिकारी उपस्थित होते.

Breaking News

Как найти реальную индивидуалку в Москве

Рынок интимных услуг в Москве — это настоящие джунгли,...

Где найти проверенную индивидуалку в Москве

Московский рынок досуга за последние годы стал одновременно прозрачнее...