रत्नागिरीरत्नागिरी जिल्हा पोलीस दलाच्या ताफ्यात दोन अत्याधुनिक सर्व्हिलन्स SML बसचा समावेशमा.अपर पोलीस...

रत्नागिरी जिल्हा पोलीस दलाच्या ताफ्यात दोन अत्याधुनिक सर्व्हिलन्स SML बसचा समावेशमा.अपर पोलीस महासंचालक (प्रशासन), पोलीस महासंचालक, महाराष्ट्र राज्य, मुंबई यांच्या माध्यमातून रत्नागिरी जिल्हा पोलीस दलास 2 अत्याधुनिक Surveillance SML Bus प्राप्त झाल्या आहेत.

रत्नागिरी जिल्हा पोलीस दलाच्या ताफ्यात दोन अत्याधुनिक सर्व्हिलन्स SML बसचा समावेश
मा.अपर पोलीस महासंचालक (प्रशासन), पोलीस महासंचालक, महाराष्ट्र राज्य, मुंबई यांच्या माध्यमातून रत्नागिरी जिल्हा पोलीस दलास 2 अत्याधुनिक Surveillance SML Bus प्राप्त झाल्या आहेत. या अत्याधुनिक बसमुळे बंदोबस्त, मोर्चे, आंदोलने व संवेदनशील प्रसंगी प्रभावी निरीक्षण व नियंत्रण ठेवणे अधिक सुलभ होणार आहे.
सदर सर्व्हिलन्स बस पोलीस दलाच्या कार्यपद्धतीनुसार आवश्यक ते बदल करून विशेषरित्या सुसज्ज करण्यात आलेल्या आहेत. या बसमध्ये 4 बाजूंना CCTV कॅमेरे बसविण्यात आले असून, त्याद्वारे परिसरावर सर्वांगीण लक्ष ठेवणे शक्य होणार आहे.
बसच्या आतून शिडीची सुविधा देण्यात आली असून, छतावर सहज उघडता येतील अशी फोल्डेबल रेलिंग बसविण्यात आलेली आहे. यामुळे काही क्षणांत सुरक्षित निरीक्षण मंच (platform) तयार करता येतो. तसेच, छत्री बसविण्यासाठी स्वतंत्र व नियोजित जागा उपलब्ध करून देण्यात आली असून, या मंचावर उभे राहून पोलीस अधिकारी व अंमलदार प्रभावीपणे बंदोबस्ताचे निरीक्षण करू शकणार आहेत.
या अत्याधुनिक Surveillance SML बसचे उद्घाटन पोलीस अधीक्षक श्री. नितीन बगाटे यांच्या शुभहस्ते करण्यात आले. यावेळी मा.अपर पोलीस अधीक्षक श्री. बी. बी. महामुनी, पोलीस उपाधीक्षक श्रीमती राधिका फडके तसेच पोलीस अधिकारी व अंमलदार उपस्थित होते.
या आधुनिक वाहनांच्या समावेशामुळे रत्नागिरी जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्था अधिक सक्षम, सुरक्षित व तंत्रज्ञानसक्षम होण्यास निश्चितच मदत होणार आहे असे पोलीस अधीक्षक नितीन बगाटे म्हणाले

Breaking News

रत्नागिरी झाडगांव एमआयडीसीतील २६ बेकायदेशीर बांधकामे जमीनदोस्त

रत्नागिरी झाडगांव एमआयडीसीतील २६बेकायदेशीर बांधकामे जमीनदोस्त-- रत्नागिरी शहरालगतच्या झाडगाव -...

समाज कल्याण सहाय्यक आयुक्त दीपक घाटे यांचा सेवापूर्ती सन्मान सोहळा

समाज कल्याण सहाय्यक आयुक्त दीपक घाटे यांचा सेवापूर्ती सन्मान...