रत्नागिरीरत्नागिरी जिल्हा बँकेने पार केला 6 हजार कोटीच्या व्यवसाय टप्पा

रत्नागिरी जिल्हा बँकेने पार केला 6 हजार कोटीच्या व्यवसाय टप्पा

रत्नागिरी जिल्हा बँकेने पार केला 6 हजार कोटीच्या व्यवसाय टप्पा—

👉चेअरमन डॉ. तानाजीराव चोरगे यांच्या कुशल नेतृत्वाचे होत आहे सर्वत्र कौतुक


👉रत्नागिरी – रत्नागिरी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने 30 सप्टेंबर 2026 अखेर 6,000 कोटी रुपयांच्या एकूण व्यवसायाचा ऐतिहासिक टप्पा पार केला आहे. ग्राहकांचा दृढ विश्वास आणि उत्कृष्ट सेवेच्या बळावर बँकेने 49 कोटी 13 लाख 36 हजार रुपयांचा भरघोस नफा मिळवून प्रगती साधली आहे .
कोकणातील सहकार क्षेत्रातील दीपस्तंभ मानल्या जाणा-या रत्नागिरी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेची यशस्वी वाटचाल सातत्याने वेगाने सुरु आहे. चालू आर्थिक वर्षाच्या अर्धवार्षिक अहवालानुसार 30 सप्टेंबर 2026 पर्यंत बँकेचा एकूण एकत्रित व्यवसाय तब्बल 6,000 कोटी रुपयांच्या पार गेला आहे.विशेष म्हणजे गतवर्षीच्या याच कालावधीतील नफ्याच्या तुलनेत यंदा बँकेने तब्बल 10 कोटी 74 लाख रुपयांची घसघशीत आणि उल्लेखनीय वाढ नोंदवली आहे. यामुळे बँकेचा निव्वळ नफा 49 कोटी 13 लाख 36 हजार रुपयांवर पोहोचला असून, वित्तीय सक्षमतेच्या दृष्टीने बँकेने सहकार क्षेत्रात एक नवा सुवर्ण इतिहास रचला आहे. बँकेच्या ठेवी,कर्जे आणि निव्वळ नफ्यातील ही वाढ कोकणातील सहकार क्षेत्रासाठी अत्यंत भूषणावह व कौतुकास्पद मानली जात आहे.
राज्यातील अग्रगण्य व आदर्श जिल्हा बँक म्हणून मोठा नावलौकिक मिळवलेल्या रत्नागिरी मध्यवर्ती बँकेने बदलत्या काळानुरुप आधुनिक तंत्रज्ञानाचा अत्यंत प्रभावीपणे अंगीकार केला आहे. जिल्ह्यातील ग्रामीण व शहरी भागातील ग्राहकांना आधुनिक ,तत्पर,पारदर्शक आणि अत्यंत विनम्र बँकिंग सेवा पुरवण्यासाठी डिजिटलायझेशनवर विशेष भर देण्यात आला आहे.सध्या बँकेच्या सर्व शाखांच्या माध्यमातून एनईफटी ,आरटीजीएस,एटीएम,मोबाईल बँकिंग आणि क्यूआर कोड यांसारख्या अत्याधुनिक सुविधा ग्राहकांना अतिशय तत्परतेने पुरवल्या जात आहेत.या डिजिटल तंत्रज्ञान सेवांचा अधिक विस्तार करताना बँक येत्या काही दिवसांतच आपल्या सर्व ग्राहकांसाठी आधार सक्षम पेमेंट सिस्टीम अर्थात एईपीएस सुविधा प्रत्यक्ष कार्यान्वित करणार आहे. विशेष म्हणजे संपूर्ण महाराष्ट्र राज्यात आपल्या ग्राहकांना एईपीएस सुविधा देणा-या अवघ्या तीन जिल्हा मध्यवर्ती बँकांपैकी रत्नागिरी बँक ही एक प्रमुख बँक ठरणार असून लवकरच ही महत्वपूर्ण सुविधा ग्राहकांच्या सेवेत रुजू होणार आहे .
बँकेने ठेवी,कर्जवाटप ,वसुली आणि नफ्यामध्ये मिळवलेल्या या नेत्रदीपक व अभूतपूर्व यशाबद्दल बँकेचे अध्यक्ष कृषिभूषण डॉ. तानाजीराव चोरगे तसेच उपाध्यक्ष बाबाजीराव जाधव यांच्यासह बँकेच्या सर्व संचालक यांनी बँकेचे सभासद ,खातेदार व ग्राहकांचे आभार व्यक्त केले आहेत. संचालक मंडळाने वेळोवेळी घेतलेले अचूक,दूरदृष्टीचे व धोरणात्मक निर्णय आणि बँकेचे सर्व अधिकारी व कर्मचारी वर्ग यांनी केलेले प्रामाणिक प्रयत्न यामुळेच बँकेला हे यश प्राप्त झाले आहे,असे मनोगत बँकेचे मुख्य कार्यकारी डॉ. सुधीर गिम्हवणेकर यांनी व्यक्त केले आहे.

Breaking News