रत्नागिरी जिल्ह्यातील उदयोन्मुख खेळाडूंना राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर स्पर्धा करण्यासाठी आवश्यक त्या आधुनिक सुविधा उपलब्ध व्हाव्यात, या दृष्टिकोनातून मिरजोळे येथे उभारण्यात येत असलेल्या अद्ययावत जिल्हा क्रीडा संकुलाची आज राज्याचे उद्योग व मराठी भाषा मंत्री आणि रत्नागिरी जिल्ह्याचे पालकमंत्री मा. ना. उदयजी सामंत ह्यांनी प्रत्यक्ष पाहणी करून कामाचा सविस्तर आढावा घेतला-.
👉या क्रीडा संकुलामध्ये बहुउद्देशीय इनडोअर हॉल, विविध खेळांसाठी सुसज्ज मैदाने, प्रशिक्षण सुविधा, खेळाडूंसाठी आवश्यक प्रशासकीय व मूलभूत सुविधा उपलब्ध असणार आहेत. जिल्ह्यातील क्रिकेट, कबड्डी, खो-खो, व्हॉलीबॉल, ऍथलेटिक्स यांसारख्या विविध क्रीडा प्रकारांना या संकुलाच्या माध्यमातून चालना मिळणार आहे. रत्नागिरीसारख्या जिल्ह्यात अनेक प्रतिभावान खेळाडू आहेत, त्यांना या संकुलामुळे सराव, स्पर्धा आणि प्रशिक्षणासाठी सक्षम व्यासपीठ मिळणार आहे असे म्हणत मा. ना. उदयजी सामंत ह्यांनी क्रीडा संकुलातील प्रलंबित कामे तातडीने पूर्ण करण्याच्या सूचना अधिकाऱ्यांना दिल्या.
रत्नागिरीच्या क्रीडा इतिहासात हे संकुल एक नवे पर्व ठरणार असून, भविष्यात येथून अनेक राष्ट्रीय दर्जाचे खेळाडू घडतील, असा मला ठाम विश्वास असल्याचे मा. ना. उदयजी सामंत म्हणाले.
