रत्नागिरी जिल्ह्यातील कुवारबांब येथील नूतनीकरण करण्यात आलेल्या ‘सिंचन भवन’ इमारतीचा भव्य उद्घाटन सोहळा राज्याचे उद्योग व मराठी भाषा मंत्री तथा रत्नागिरी जिल्ह्याचे पालकमंत्री मा. ना. उदयजी सामंत ह्यांच्यासह विविध क्षेत्रांतील मान्यवर, लोकप्रतिनिधी आणि शासकीय अधिकाऱ्यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाला.
यावेळी संवाद साधतांना मा. ना. उदयजी सामंत ह्यांनी रत्नागिरीच्या प्रत्येक क्षेत्रात आधुनिकता आणण्याचा आमचा मानस आहे. सिंचन भवन हे केवळ एक शासकीय कार्यालय नसून आपल्या जिल्ह्यातील शेती आणि शेतकऱ्यांच्या समृद्धीचे केंद्र ठरणार आहे. या इमारतीच्या नूतनीकरणा मुळे पाटबंधारे विभागाच्या कामकाजाला आधुनिक रूप मिळाले असून, जिल्ह्यातील सिंचन योजनांचे नियोजन आणि अंमलबजावणी आता अधिक गतीने आणि प्रभावीपणे होईल, हा विश्वास आहे. रत्नागिरीच्या सर्वांगीण विकासासाठी सदैव कटिबद्ध असल्याचा निर्धार व्यक्त केला.
याप्रसंगी नगराध्यक्ष शिल्पाताई सुर्वे, उपनगराध्यक्ष समीर तिवरेकर, जिल्हा परिषद उपाध्यक्ष विलास चाळके, पाणी पुरवठा सभापती निमेश नायर, शिवसेनेचे शहरप्रमुख बिपीन बंदरकर, भाजपाचे शहराध्यक्ष दादा ढेकणे, महेश उर्फ बाबूशेठ म्हाप, बंड्याशेठ साळवी, स्मितल पावसकर, सर्व नगरसेवक, प्रांताधिकारी जीवन देसाई, मुख्याधिकारी वैभव गारवे, पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता विजय पाटील व इतर पदाधिकारी आणि शासकीय अधिकारी उपस्थित होते.
