रत्नागिरीरत्नागिरी जिल्ह्यातील जिल्हा परिषद व पंचायत समित्यांच्या निवडणुकांसाठी जिल्हा प्रशासन सज्ज

रत्नागिरी जिल्ह्यातील जिल्हा परिषद व पंचायत समित्यांच्या निवडणुकांसाठी जिल्हा प्रशासन सज्ज

५६ जिल्हा परिषद गट व ११२ पंचायत समित्या गणांसाठी ही निवडणूक होणार आहे

जिल्हाधिकारी मनुज जिंदल यांची पत्रकार परिषदेत माहिती

रत्नागिरी जिल्ह्यातील जिल्हा परिषद व पंचायत समिती यांच्या निवडणुकांसाठी जिल्हा प्रशासन सज्ज झाले आहे. जिल्ह्यातील 56 जिल्हा परिषद गट व 112 पंचायत समिती गणांसाठी ही निवडणूक होणार आहे. या संदर्भातला सविस्तर आढावा रत्नागिरीचे जिल्हाधिकारी मनुज जिंदल यांनी पत्रकार परिषदेमध्ये दिला. मंडणगड तालुक्यात 20 जिल्हा परिषद गट व 4 पंचायत समिती गण, दापोली तालुक्यात 6 जिल्हा परिषद गट व 12 पंचायत समिती गण, खेड तालुक्यात 7 जिल्हा परिषद गट व 14 पंचायत समिती गण, चिपळूण तालुक्यात 9 जिल्हा परिषद गट व 18 पंचायत समिती गण, गुहागर तालुक्यात पाच जिल्हा परिषद गट व दहा पंचायत समिती गण, रत्नागिरी तालुक्यात दहा जिल्हा परिषद गट व 20 पंचायत समिती गण, संगमेश्वर तालुक्यात सात जिल्हा परिषद गट व 14 पंचायत समिती गण, लांजा तालुक्यात चार जिल्हा परिषद गट व आठ पंचायत समिती गण आणि राजापूर तालुक्यात सहा जिल्हा परिषद गट व 12 पंचायत समिती गण अशा या निवडणुका होणार आहेत. या निवडणुकांसाठी एकूण 1693 मतदान केंद्र असणार आहे. कंट्रोल युनिट 2143 व बॅलेट युनिट 4286 असणार आहेत. दिनांक 16 जानेवारी 2026 ते 21 जानेवारी 2026 या कालावधीत सकाळी अकरा ते दुपारी तीन या वेळेत उमेदवारी अर्ज सादर करणे, रविवार दिनांक 18 जानेवारी रोजी सार्वजनिक सुट्टी असल्याने नामनिर्देशन पत्र सादर करता येणार नाही. नामनिर्देशन पत्राची छाननी 22 जानेवारी 2026 रोजी होईल. छाननी प्रक्रिया झाल्यानंतर अंतिम उमेदवारांची यादी 22 जानेवारी रोजी सादर करण्यात येईल. उमेदवारी अर्ज माघारी घेणे दिनांक 23, 24 व 27 या दिवशी उमेदवारी अर्ज माघारी घेता येतील. दिनांक 25 व 26 रोजी सार्वजनिक सुट्टी असल्याने उमेदवारी अर्ज माघारी घेण्याची नोटीस स्वीकारली जाणार नाही. दिनांक 27 जानेवारी 2026 रोजी दुपारी साडेतीन वाजल्यानंतर निवडणूक लढवणाऱ्या उमेदवारांची यादी प्रसिद्ध करण्यात येईल व निशाणी वाटप करण्यात येईल. दिनांक 5 फेब्रुवारी रोजी सकाळी साडेसात ते सायंकाळी साडेपाच वाजेपर्यंत मतदानाचा दिवस असणार आहे. शनिवार दिनांक 7 फेब्रुवारी रोजी सकाळी दहा वाजल्यापासून मतमोजणी होणार आहे. अशी सविस्तर माहिती जिल्हाधिकारी मनुज जिंदल यांनी आज पत्रकार परिषदेत दिली.

Breaking News