रत्नागिरीरत्नागिरी तालुक्यातील झाडगांव म्युनिसिपल बाहेर शिरगावं जिल्हा परिषद गट आणि गणातुन शिवसेना...

रत्नागिरी तालुक्यातील झाडगांव म्युनिसिपल बाहेर शिरगावं जिल्हा परिषद गट आणि गणातुन शिवसेना भाजप महायुतीचे उमेदवार सौ.श्रदा दिपक मोरे आणि साक्षी परेश कुमठेकर यांच्या प्रचारासाठी महायुती चे नेते आणि कार्यकर्ते मैदानात उतरले असल्याने आजतरी दोन्ही उमेदवारांचे पारडे जड असल्याचे दिसून येत आहे..

रत्नागिरी तालुक्यातील झाडगांव म्युनिसिपल बाहेर शिरगावं जिल्हा परिषद गट आणि गणातुन शिवसेना भाजप महायुतीचे उमेदवार सौ.श्रदा दिपक मोरे आणि साक्षी परेश कुमठेकर यांच्या प्रचारासाठी महायुती चे नेते आणि कार्यकर्ते मैदानात उतरले असल्याने आजतरी दोन्ही उमेदवारांचे पारडे जड असल्याचे दिसून येत आहे.. पालकमंत्री डॉ उदय सामंत यांनी शिरगांव गावात मोठ्या प्रमाणात विकासकामे केली असल्याने मतदार राजा या निवडणुकीत दोन्ही उमेदवारांना भरभरून मते देऊन जिल्हा परिषद आणि पंचायत समिती मध्ये पाठवणार असल्याचा विश्वास सरपंच फरीदा काझी.माजी उप सरपंच अल्ताफ संगमेश्वरी.उपसरपंच मिलिंद बाणे विभाग प्रमुख भैय्या शिंदे.परेश कुमठेकर आदींनी व्यक्त केला आहे… दोन्ही उमेदवारांना विजयी करण्यासाठी शिवसेनेचे नेते आणि कार्यकर्ते संपूर्ण शिरगांव गावात घरोघरी जाऊन प्रचार करताना दिसत आहेत.. शिरगांव हा शिवसेनेचा बालेकिल्ला असल्याने मतदार राजा श्रद्धा दिपक मोरे यांना जिल्हा परिषदेत आणि साक्षी परेश कुमठेकर यांना पंचायत समिती मध्ये पाठवणारच असा विश्वास भैय्या शिंदे यांनी व्यक्त केला आहे… पक्षाचे सर्वच लहान मोठे नेते आणि कार्यकर्ते दोन्ही उमेदवारांना विजयी करण्यासाठी अहोरात्र काम करीत असल्याचे दिसून येत आहे… पालकमंत्री डॉ उदय सामंत यांची शिरगांव गावावर नेहमीच कृपादृष्टी राहिली असल्याने त्यांनी इतर कुठल्याही निधीची वाट न बघता एमआयडीसीच्या पैशातून गावातील मुख्य रस्ते डांबरीकरण केले आहेत तसेच अनेक पाणी योजना पूर्ण होण्याच्या मार्गावर आहेत त्यामुळे यावेळी शिरगांव गावातील मतदार महायुतीच्या दोन्ही उमेदवारांना भरघोस मतांनी विजयी करतील असा विश्वास पालकमंत्री डॉ उदय सामंत यांनी व्यक्त केला आहे

Breaking News