अब्दुल्ला ईब्जी यांना डॉक्टर अब्दुल्ला ईब्जी वर होत आहे अभिनंदनाचा वर्षाव—
रत्नागिरी तालुक्यातील मजगांव येथील इब्जी कुटुंबातील डाॅक्टर अब्दुल्ला अब्दुल मजीद इब्जी यांनी एम्. बी. बी. एस्. बेळगांव कर्नाटक येथून केल्या नंतर संभाजी नगर महाराष्ट्र येथून एम्. डी. ची पदवी प्राप्त केली.
मजगांव येथील त्यांनी पहिलेच एम्. डी. डाॅक्टर होण्याचा मान मिळवला. त्यांच्या या उत्तुंग भरारी मुळे मजगांव चे सरपंच फैय्याज मुकादम, उप सरपंच शरीफ इब्जी , आत्या फरीदा हकीम काका अब्दुल वहाब हकीम, चुलते एजाज इब्जी , आजोबा दाऊद हमदुले, अकील हमदुले, रियाज हमदुले,सर्व कुटुंबियांनी , मित्रमंडळी तसेच ग्रामस्थांनी त्यांचे कौतुक करून भरघोस शुभेच्छा दिल्या.
डाॅक्टर अब्दुल्ला इब्जी यांनी सर्वांच्या शुभेच्छा स्वीकारुन सर्वांचे आभार मानले. तसेच आपण रुग्णांची उत्तम प्रकारे सेवा करु, असे ही सांगितले आहे. कोकण 24 तास न्यूज चॅनल तर्फे डॉक्टर अब्दुल्ला ईब्जी यांचे अभिनंदन व पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा
