रत्नागिरी नगरपरिषदेच्या सर्व १६ प्रभागांतील सफाई कामगारांना दिवाळी फराळाचे वाटप

0
2

रत्नागिरी नगरपरिषदेच्या सर्व १६ प्रभागांतील सफाई कामगारांना दिवाळी फराळाचे वाटप-

रत्नागिरी : दिवाळी सणाचे औचित्य साधून प्रभाग क्रमांक १५ च्या भाजपा नगरसेविका सौ. वर्षा परशुराम ढेकणे तसेच भारतीय जनता पार्टी रत्नागिरी शहराध्यक्ष दादा ढेकणे यांच्या माध्यमातून रत्नागिरी नगरपरिषदेच्या सर्व १६ प्रभागांतील सफाई कामगारांना दिवाळी फराळाचे वाटप करण्यात आले.

शहर स्वच्छ आणि सुंदर ठेवण्यासाठी अहोरात्र मेहनत घेणाऱ्या सफाई कामगारांच्या कार्याचा सन्मान आणि त्यांच्या आनंदात सहभागी होण्याच्या भावनेतून हा उपक्रम राबविण्यात आला. सण-उत्सवाच्या काळातही शहराच्या स्वच्छतेची जबाबदारी पार पाडणाऱ्या या कर्मचाऱ्यांप्रति कृतज्ञता व्यक्त करण्याचा हा एक छोटासा प्रयत्न असल्याचे यावेळी सांगण्यात आले.

यावेळी भारतीय जनता पार्टीचे उपनगराध्यक्ष समीर तिवरेकर, प्रदेश युवा सचिव अद्वैत कुलकर्णी,संदीप रसाळ, विजय माळवदे आशिष मोरे आदी मान्यवर उपस्थित होते.

सफाई कामगारांच्या चेहऱ्यावर दिवाळीचा आनंद फुलवणाऱ्या या उपक्रमातून सामाजिक बांधिलकी आणि माणुसकीचा संदेश देण्यात आला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here