ही परंपरा गेल्या अनेक वर्षांपासून सुरू आहे आणि हा एकप्रकारे राष्ट्रीय एकात्मतेला प्रेरणा देणारा संदेश आहे रत्नागिरी ही सुफी संताची भुमी म्हणून ओळखली जाते. या ठिकाणी हिंदू मुस्लिम अनेक सण एकत्रित साजरे करीत असतात.. गणपती उत्सवात तर अनेक मुस्लिम बांधव बाप्पांच्या मिरवणूकीवर पुष्पवृष्टी करून धार्मिक एकोपा जपण्याचे काम करीत असतात–
रत्नागिरी येथील श्री देव भैरी देवस्थानच्या धुळवडीच्या कार्यक्रमात देवस्थान चे मुस्लिम समाजातील मानकरी श्री अश्फाक काद्री कुटुंबीय व देवस्थान चे अध्यक्ष मुन्ना सुर्वे आणि सर्व ट्रस्टींनी गळा भेट घेतली.
