रत्नागिरीरत्नागिरी येथे मनसेत केला अनेकांनी पक्ष प्रवेश

रत्नागिरी येथे मनसेत केला अनेकांनी पक्ष प्रवेश

मनसे अध्यक्ष श्री. राजसाहेब ठाकरेंच्या तेजस्वी विचारांनी प्रेरित होऊन रत्नागिरी तालुक्यातील अनेक तरुणांनी मनसेत पक्षप्रवेश केला आहे…या सर्व प्रवेशकर्त्या तरुणांचे मनसे तालुका अध्यक्ष श्री. रुपेश जाधव व सहकारी पदाधिकाऱ्यांनी पक्षात स्वागत केले.

रत्नागिरी तालुक्यातील मिरजोळे, कुवारबाव जि. प. गटातील श्री. सौरभ नाचणकर, श्री. विशाल नाणीजकर, आर्यन चव्हाण, अथर्व शिंदे, प्रथमेश लोहार, रुचिग मुडे, विराज बिजम आदी तरुणांनी मनसेचा झेंडा हाती घेतला असून आगामी जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर हा पक्ष प्रवेश संघटनेला बळ देणारा आहे.

या पक्षप्रवेश प्रसंगी मनसे रत्नागिरी तालुका अध्यक्ष श्री रुपेश जाधव, मा.जिल्हा सचिव श्री. बिपीन शिंदे, तालुका उपाध्यक्ष श्री राजू पाचकुडे, श्री. सागर पावसकर, महिला सेना तालुका सचिव आकांक्षा पाचकुडे, जनहित कक्ष उपचिटणीस ॲड माधवी पालकर , श्री. अक्षय मोरे, पप्पू पेडणेकर, नितीन रायकर, सर्वेश जाधव, मार्विक नारकर, तेजस नागवेकर आदीसह मोठ्या संख्येने महाराष्ट्र सैनिक उपस्थित होते

Breaking News