रत्नागिरीरत्नागिरी येथे मराठी भाषा केंद्र २५ कोटी निधी मंजूरीची घोषणा साथी एस...

रत्नागिरी येथे मराठी भाषा केंद्र २५ कोटी निधी मंजूरीची घोषणा साथी एस एम जोशी यांचे गोळप गावी स्मारक उभारणार – पालक मंत्री उदय सामंत

रत्नागिरी येथे मराठी भाषा केंद्र २५ कोटी निधी मंजूरीची घोषणा साथी एस एम जोशी यांचे गोळप गावी स्मारक उभारणार.पालक मंत्री उदय सामंत

👉रत्नागिरी येथे एका अनोख्या सभेचे आयोजन शासनाच्या मराठी भाषा विभागाने रत्नागिरी जिल्हाधिकारी कार्यालयातील अद्ययावत दालनात पालकमंत्री डॉ उदय सामंत यांच्या प्रमुख उपस्थितीत केले होते. रत्नागिरी जिल्ह्यातील सर्व साहित्यिक, साहित्य मंडळे, संस्था भाषा विषयात काम करणारे प्राध्यापक, लेखक,कवी, लोककलावंत आदी मान्यवरांना विशेष निमंत्रित करण्यात आले होते.
राज्याचे मराठी भाषामंत्री ना. उदय सामंत यांचा थेट संवादात त्यांनी रत्नागिरी येथे भाषा संग्रहालय केंद्र सुरु करण्याचा संकल्प व्यक्त करतांना जिल्ह्यातील साहित्यिकांच्या सुचना समजून घेतल्या. भाषेचा इतिहास, संस्कृती, साहित्य, लोकजीवन, तंत्रज्ञान आणि संवाद यांचे जिवंत दर्शन घडवणारे केंद्र असेल .
रत्नागिरी जिल्ह्यातील संगमेश्वरी, मुस्लिम कोंकणी ( दालदी) राजापूरी आदी बोली भाषेचा अभ्यास करणारे विशेष संशोधन केंद्र येथे होणार असल्याचे सांगण्यात आले. लोककलेच्या भाषिक विविध साहित्य दालन असेल.
संवादात्मक (Interactive) विभाग, स्पर्शसंवेदनशील (Touch Screen) माहिती. “तुमचा उच्चार ओळखा” प्रणाली

  • शब्दकोडी, भाषा खेळ
  • कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) आधारित भाषांतर
  • म्हणी, वाक्प्रचार, समानार्थी-विरुद्धार्थी शब्द
  • दुर्मिळ शब्द, नवशब्द, डिजिटल शब्दकोश
  • OCR, भाषांतर तंत्रज्ञान
  • भाषण ओळख (Speech Recognition)
  • Text-to-Speech, लोककला, लोकगीत, पारंपरिक वाद्ये, सण-उत्सवातील भाषा, दुर्मिळ ग्रंथ, डिजिटल ग्रंथालय, संशोधकांसाठी अभ्यासिका, ई-संग्रह
    आदी विविध सुचनांची दखल यावेळी घेण्यात आली.
    या भाषा संग्रहालय साठी १ एकर जागा रत्नागिरी शहरात सन्मित्र नगर येथे निश्चित केली असून लवकरच हे काम सुरु होत असल्याचे मंत्रीमहोदयांनी जाहीर केले. हे रत्नागिरी च्या साहित्यिक परंपरेला प्रगल्भता आणि सांस्कृतिक उंची वाढविणारे आहे.
    या वेळी देशाच्या स्वातंत्र्य चळवळीतील झुंझार सेनानी, संयुक्त महाराष्ट्र चळवळीचे प्रमुख सेनापती , युवकांचे आयडॅाल, पुरोगामी चळवळीतील वैचारिक आधारवड साथी एस एम जोशी यांचे भव्य स्मारक त्यांच्या गोळप या गावी उभारण्याचा संकल्प ना. उदय सांमंत यांनी व्यक्त केला. तसेच चिपळूण येथील जेष्ठ लेखक इंधनकार हमीद दलवाई, दापोलीचे गझलकार बद्दीउजमा खॅांवर या साहित्यिकांचे स्मारक पुढील पिढीला प्रेरणा देत राहतील अशी उभारु असेही सांगितले. जिल्ह्यातील साहित्य चळवळीतील फार महत्वपूर्ण बाब म्हणावी लागेल.

Breaking News