रत्नागिरीरत्नागिरी येथे ‘माझं गाव, आरोग्यसंपन्न गाव’ अभियानाची तालुकास्तरीय कार्यशाळा उत्साहात संपन्न

रत्नागिरी येथे ‘माझं गाव, आरोग्यसंपन्न गाव’ अभियानाची तालुकास्तरीय कार्यशाळा उत्साहात संपन्न

रत्नागिरी येथे ‘माझं गाव, आरोग्यसंपन्न गाव’ अभियानाची तालुकास्तरीय कार्यशाळा उत्साहात संपन्न
ग्रामपंचायत, आरोग्य विभाग आणि लोकप्रतिनिधींच्या समन्वयातून आरोग्यसंपन्न गाव निर्माण करण्याचे आवाहन
रत्नागिरी : ‘माझं गाव, आरोग्यसंपन्न गाव’ अभियानाची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी लोकनेते शामराव पेजे सभागृह ,रत्नागिरी येथे तालुकास्तरीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. ग्रामपंचायत, आरोग्य विभाग आणि लोकप्रतिनिधी यांच्या समन्वयातून गावोगावी आरोग्यविषयक उपक्रम प्रभावीपणे राबवून आरोग्यसंपन्न गाव निर्माण करण्याचे आवाहन यावेळी करण्यात आले.
या कार्यशाळेला जिल्हा परिषद शिक्षण व अर्थ समितीचे सभापती मा. नंदकुमार मुरकर, रत्नागिरी पंचायत समितीचे सभापती मा. प्रवीण पांचाळ, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अनिरुद्ध आठल्ये, अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. महेंद्र गावडे आणि गटविकास अधिकारी चेतन शेळके, प्रभारी तालुका आरोग्य अधिकारी डॉ. मुक्तेश्वरी पाखरे यांची प्रमुख उपस्थिती होती.
यावेळी जिल्हा परिषद सदस्य राजेश साळवी, वैभव पाटील, महेंद्र झापडेकर, श्रीमती हर्षदा गावडे, श्रीमती श्रद्धा मोरे, पंचायत समिती सदस्य श्रीमती कांचन नागवेकर, श्रीमती पूर्वा दुर्गवळी, श्रीमती साक्षी कुमठेकर, श्रीमती स्वाती शिंदे, श्री. दादा दळी, श्री. स्वप्नील मयेकर तसेच तसेच सरपंच ,वैद्यकीय अधिकारी , ग्रामपंचायत अधिकारी ,आरोग्य कर्मचारी उपस्थित होते.
आपल्या अध्यक्षीय भाषणात पंचायत समितीचे सभापती प्रवीण पांचाळ यांनी सर्व विभागांनी समन्वयाने एकत्रितपणे काम करून रत्नागिरी तालुका आरोग्यसंपन्न बनविण्याचे आवाहन केले. जिल्हा परिषद सदस्य श्री. महेंद्र झापडेकर यांनी प्रत्येकाने स्वतःपासून सुरुवात करून एकत्रित प्रयत्न केल्यास आरोग्यसंपन्न गाव निर्माण करण्याचे उद्दिष्ट निश्चितच साध्य होईल, असा विश्वास व्यक्त केला. पंचायत समिती सदस्य श्रीमती कांचन नागवेकर यांनी अभियान केवळ बक्षीस मिळविण्यापुरते मर्यादित न ठेवता त्याची सुरुवात स्वतःपासून व आपल्या कुटुंबापासून केल्यास गाव आरोग्यदायी होऊन अभियान अधिक प्रभावीपणे यशस्वी होईल, असे मत व्यक्त केले.जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अनिरुद्ध आठल्ये यांनी आपल्या प्रास्ताविकात बदलत्या जीवनशैलीमुळे उद्भवणाऱ्या आरोग्यविषयक समस्यांवर वेळीच उपचार करणे गरजेचे असल्याचे सांगितले. आजारांचे वेळीच निदान, नियमित आरोग्य तपासणी आणि प्रतिबंधात्मक उपाययोजना यांना प्राधान्य देणे आवश्यक आहे. ‘माझं गाव आरोग्य संपन्न गाव’ अभियान नियोजनबद्ध पद्धतीने राबविण्यासाठी उपस्थितांना त्यांनी मार्गदर्शन केले. तसेच अभियानातील विविध निर्देशांकांची माहिती दिली. अभियानांतर्गत राबविण्यात येणाऱ्या उपक्रमांची नोंद, आवश्यक कागदपत्रे व अहवाल व्यवस्थित ठेवून सर्व निकषांची पूर्तता केल्यास अभियानात अधिक गुण मिळविणे आणि पुरस्कार प्राप्त करणे शक्य असल्याचे त्यांनी नमूद केले. प्रभारी तालुका आरोग्य अधिकारी डॉ. मुक्तेश्वरी पाखरे यांनी रत्नागिरी तालुक्यात अभियानाच्या कालावधीत राबविण्यात येणाऱ्या उपक्रमांची रूपरेषा व आतापर्यंत केलेल्या कामाची आकडेवारी सादर केली.
पंचायत समितीचे सभापती मा. प्रवीण पांचाळ यांच्या अध्यक्षतेखाली ही कार्यशाळा पार पडली.दरम्यान आरोग्य कर्मचाऱ्यांनी पथ नाट्याद्वारे आरोग्य जनजागृतीपर पथनाट्य सादर करून सर्वांची मने जिंकून घेतली. गावपातळीवर आरोग्यविषयक जनजागृती करणे, प्रतिबंधात्मक आरोग्यसेवांना प्राधान्य देणे, नियमित आरोग्य तपासणीला प्रोत्साहन देणे, स्वच्छता व आरोग्यविषयक उपक्रम राबविणे आणि ग्रामपंचायत व आरोग्य विभागातील समन्वय बळकट करणे, या बाबींवर कार्यशाळेत भर देण्यात आला.
अभियान यशस्वी करण्यासाठी ग्रामपंचायतींचे सरपंच, ग्रामविकास अधिकारी, प्राथमिक आरोग्य केंद्रांचे वैद्यकीय अधिकारी आणि आरोग्य कर्मचारी यांनी परस्पर समन्वयाने व नियोजनबद्ध पद्धतीने कार्य करण्याचे आवाहन करण्यात आले. कार्यशाळेला तालुक्यातील विविध ग्रामपंचायतींचे सरपंच व ग्रामविकास अधिकारी, वैद्यकीय अधिकारी ,समुदाय आरोग्य अधिकारी, आरोग्य विभागातील कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभारप्रदर्शन प्रभारी आरोग्य विस्तार अधिकारी परशुराम निवेंडकर यांनी केले.

-(डॉ. मुक्तेश्वरी पाखरे),
तालुका आरोग्य अधिकारी (प्र.)
रत्नागिरी

Breaking News

कोकण रेल्वेने वाहिली शहीदा ना आदरांजली

कोकण रेल्वेने वाहिली शहीदा ना आदरांजली. रत्नागिरी:- कोकण रेल्वेने आज...