रत्नागिरीचे पालकमंत्री ना. उदय सामंत यांच्या राजकीय मुत्सद्देगिरीचा दिसून आला प्रत्यय–
रत्नागिरी जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुकीत राज्याचे उद्योगमंत्री आणि रत्नागिरीचे पालकमंत्री ना. उदय सामंत यांच्या राजकीय मुत्सद्देगिरीचा प्रत्यय दिसून आला आहे. रत्नागिरीतील नाणीज पंचायत समिती गणातून (जुना पाली गण) शिवसेनेच्या उमेदवार डॉ. पद्मजा संजय कांबळे या बिनविरोध निवडून आल्या आहेत. संपूर्ण महाराष्ट्रातील शिवसेनेची बिनविरोध निवडून येणारी ही पहिलीच जागा असल्याचे बोलले जात आहे.
जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुकीसाठी अर्ज दाखल करण्याचा कालचा शेवटचा दिवस होता. शेवटच्या दिवशी अर्ज दाखल करण्यासाठी मोठी गर्दी झाली होती. या निवडणुकीत राज्याचे उद्योगमंत्री आणि रत्नागिरीचे पालकमंत्री ना. उदय सामंत यांच्या राजकीय मुत्सद्देगिरीचा आणि व्यूहरचनेचा प्रत्यय दिसून येत आहे.
