रविवार दिनांक 21/9/2025 रोजी रत्नागिरी तालुक्यातील मौजे भगवती नगर रामरोड गणपतीपुळे येथील श्री भूषण जयसिंग घाग यांचे मालकीचे विहिरीत बिबट्या हा वन्य प्राणी पडलेला असल्याची माहिती सकाळी 10.00 वाजण्याच्या सुमारास श्री भूषण जयसिंग घाग यांनी वनपाल पाली यांना दूरध्वनी वरून माहीती दिली,त्याप्रमाणे तात्काळ परिक्षेत्र वन अधिकारी रत्नागिरी यांना सदरची माहिती देऊन पिंजरा रेस्क्यू टीम व साहित्यासह घटनास्थळी येऊन पाहणी केली असता सदरची विहीर ही गोल 3 फूट उंचीचा कठडा असलेली असून विहिरीची गोलाई सुमारे 16 फूट आणि खोली 40 फूट असून 5 फुटावर पाण्याची पातळी या प्रमाणे असून घराच्या मागील बाजूस 100 फूट अंतरावर असल्याचे दिसून आले विहिरीमध्ये वन्यप्राणी बिबट्या मोटर पाईप ला व दोरीला धरून पाण्यावर असल्याचे दिसून आले.
तात्काळ पिंजऱ्याला दोऱ्या बांधून पाण्याची खोली कमी असल्यामुळे सुरक्षेसाठी विहिरीवर जाळे टाकून पिंजरा विहिरीत सोडण्यात आला बिबट्या अर्ध्या तासाच्या आतच बिबट्यास सुरक्षित पिंजऱ्यात जेरबंद केला. पशुधन विकास अधिकारी मालगुंड श्री स्वरूप काळे यांच्याकडून बिबट्याची वैद्यकीय तपासणी करून घेतली सदर बिबट्या हा मादी जातीचा असून अंदाजे 10 ते 12 महिनेचा आहे सदर रेस्क्यूची कार्यवाही ही विभागीय वन अधिकारी रत्नागिरी चिपळूण श्रीमती गिरिजा देसाई तसेच सहाय्यक वनसंरक्षक श्रीमती प्रियंका लगड यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली सदर कामगिरीसाठी प्रकाश सुतार परिक्षेत्र वन अधिकारी रत्नागिरी, न्हानू गावडे वनपाल पाली, विराज संसारे वनरक्षक रत्नागिरी, श्रीमती शर्वरी कदम वनरक्षक जाकादेवी, श्री किरण पाचारणे तसेच पोलीस अधिकारी श्री ऐ. व्ही. गुरव श्री आर. एस. घोरपडे, श्री ऐ. ऐ अंकार, श्री. एन. एस गुरव गावच्या सरपंच सौ श्रेया राजवाडकर, गावचे पोलीस पाटील श्री. सुरज भुते, वन्य प्राणी मित्र महेश धोत्रे ,ऋषिराज जोशी, रोहित खेडेकर, आदर्श मयेकर तसेच गावातील ग्रामस्थ यांचे मोलाचे सहकार्य लाभले वनाधिकारी यांनी उपस्थित सर्वांचे आभार मानले सदरचा बिबट्या हा सुस्थितीत असल्याने त्याला नैसर्गिक अधिवासात मुक्त केले. अशा प्रकारच्या घटना घडल्यास किंवा वन्यप्राणी अडचणी सापडल्यास वनविभागाचा टोल फ्री क्रमांक 1926 किंवा 9421741335 या क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन विभागीय वनाधिकारी चिपळूण गिरिजा देसाई यांनी केलेले आहे