(खेड,चिपळूण): कळंबस्ते फाटा ते धामणंद रोड ची खड्डे पडून दुर्दशा झाली आहे अनेक मोठमोटे खड्डे पडले असून त्यामुळे अपघात होत आहेत वाहनचालक व पादचारी यांचा जिवाला धोका निर्माण झालेला आहे सदरचा रस्ता हा खेड सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अखत्यारित येतो अनेक वेळा मागणी करून ही दुर्लक्ष केले जात आहे म्हणून यंदाची दिवाळी खड्ड्यात फटाके वाजवून आम्ही साजरी करीत आहोत कारण या खड्ड्यात वाजवलेल्या फटाक्यांचा आवाज संबंधित अधिकाऱ्यांच्या कानात पोहोचला पाहीजे यानंतर ताबडतोब खड्डे भरून न झाल्यास यानंतरचे फटाके संबंधित अधिकाऱ्यांच्या कार्यालयात वाजवले जातील असा इशारा माजी सभापती शौकत मुकादम यांनी दिला आहे दिनांक 20 आक्टोबर रोजी सकाळी 10 वाजता कळंबस्ते पेठ येथे खड्ड्यात फटाके वाजवून दिवाळी साजरी करण्यात आली यावेळी कळंबस्ते सरपंच विकास गमरे,उपसरपंच गजानन महाडीक,ग्रामपंचायत सदस्य विवेक महाडीक,शिरीषदादा शिंदेसाहेब,दिपक शिगवण,पांडुरंग पिलावरे,ह.भ.प चव्हाण बुवा,हळदे,अमेय महाडीक,सौरभ महाडीक,विकास जोरवेकर इत्यादी नागरीक उपस्थित होते.
© Copyright - Konkan24News. Website Design, Development & Maintain by SM Media. +91 96047 60330.
