राजापूर तालुक्यातील राजकारणात मोठा भूकंप घडला आहे. शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला मोठा धक्का बसत, राष्ट्रवादीचे तालुका प्रमुख आबा आडिवरेकर यांनी आपल्या शेकडो कार्यकर्त्यांसह शिंदे गटाच्या शिवसेनेत प्रवेश केला. आमदार किरण सामंत यांच्या उपस्थितीत झालेल्या या भव्य प्रवेश सोहळ्यात भगवा फडकवून आडिवरेकर यांनी शिवसेनेत अधिकृतरीत्या प्रवेश घेतला.
या प्रसंगी आमदार किरण सामंत म्हणाले, “राजापूर तालुक्यातील जनतेच्या प्रश्नांसाठी शिवसेना सदैव कटिबद्ध आहे. आबा आडिवरेकर यांचा प्रवेश हा पक्ष संघटनेसाठी नवी ऊर्जा देणारा क्षण आहे. त्यांच्या नेतृत्वामुळे तालुक्यात शिवसेनेचा पाया अधिक मजबूत होईल.”
तर आबा आडिवरेकर यांनी या वेळी बोलताना सांगितले, “शिवसेना ही जनतेच्या हितासाठी कार्य करणारी खरी जनसंगठन आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वावर आम्हाला विश्वास आहे. राजापूर तालुक्याच्या विकासासाठी आम्ही एकजुटीने काम करू.”
आडिवरेकर यांच्यासोबत तालुक्यातील अनेक नामवंत पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादीला रामराम ठोकत शिवसेनेत प्रवेश केला. यामध्ये ऋषी राम मोरे (प्रदेश सदस्य), प्रगती रेडीज (महिला तालुकाप्रमुख), सुनील जाधव, गुरव सर, विनोद पवार, अमित चिले, जयेश दळवी, जावेद नाईक, इब्राहिम लांजेकर, संजय गुरव, जगदीश गुरव, सखाराम म्हाडये, रामेश म्हाडये, महादेव पड्यार, संजीव मोरे, रफिक नाईक, फकीर नाईक, नजीर टोले, फरहान गोलंदाज, आत्माराम नारकर, उत्तम नारकर, सूर्यकांता चव्हाण, प्रतीक घाट, विजय पावसकर, सूर्यकांत जाधव, लहू भागन, जगन्नाथ भागन, परशुराम घडची, बाजीराव विश्वासराव, दया शेलार, अक्षय मोरे यांसह शेकडो कार्यकर्त्यांचा समावेश होता.
या कार्यक्रमास जिल्हा संघटक प्रकाश कोवलेकर, दुर्वाताई तावडे, तालुकाप्रमुख दीपक नागले, अप्पा साळवी, सुनील गुरव, शैलेश साळवी, अविनाश पराडकर, दीपक बेंद्रे, आत्माराम सुतार, बाबालाल फरार, सुरेश ऐनाकर, बाबू वेरवडे, अमर जाधव, रवींद्र सावंत, विकास रेघे, मंदार सप्रे, गणेश तावडे, श्वेता पवार, विधी पांचाळ, बाळा चव्हाण, बाबा सावंत, तुषार पांचाळ, महादेव गुरव, संतोष बारस्कर यांच्यासह असंख्य शिवसैनिक उपस्थित होते.
या मोठ्या राजकीय घडामोडीनंतर राजापूर तालुक्यातील समीकरणांमध्ये मोठा बदल होणार असल्याचे स्पष्ट दिसते. राष्ट्रवादी काँग्रेसच्या पायाला तडे गेल्याने शिवसेनेचा आत्मविश्वास वाढला आहे. तालुक्यातील राजकारणाला आता नव्या घडामोडींचा रंग चढणार असून, येत्या निवडणुकांसाठी हा प्रवेश निर्णायक ठरू शकतो, अशी चर्चा स्थानिक राजकीय वर्तुळात सुरू आहे.
