रत्नागिरीराज्याचे उद्योग व मराठी भाषा मंत्री आणि रत्नागिरी जिल्ह्याचे पालकमंत्री मा. ना....

राज्याचे उद्योग व मराठी भाषा मंत्री आणि रत्नागिरी जिल्ह्याचे पालकमंत्री मा. ना. उदयजी सामंत ह्यांनी राजापूर येथील राजीव गांधी मैदानावर झालेल्या द फोक व्याख्यानाला उपस्थित राहून प्रेक्षकांशी संवाद साधला आणि वादन – गायन जुगलबंदीसह रंगणाऱ्या लोककलांचा आनंद घेतला.

यावेळी बोलताना, लोकसंगीत हे महाराष्ट्राचं वैभव आहे. अभंग, भारूड, लावणी, गवळणी असे लोकसंगीताचे कितीतरी प्रकार समाजात रुजलेले आहेत. अलीकडच्या काळात या कला लोप पावत चालल्या आहेत असं चित्र दिसत असताना २० हौशी तरुण रंगकर्मी एकत्र येऊन लोककला एका नव्या ढंगात प्रेक्षकांसमोर ‘द फोक आख्यान’ या सांगीतिक कार्यक्रमाच्या माध्यमातून सादर करून आपलं वैभव टिकवून ठेवण्याचा प्रयत्न करत आहेत हे कौतुकास्पद असल्याचे मा. ना. उदयजी सामंत ह्यांनी म्हटले.

यावेळी सोबत रोहयो मंत्री ना.भरतशेठ गोगावले, लांजा – राजापूर चे आमदार श्री. किरणभैय्या सामंत आणि स्थानिक पदाधिकारी उपस्थित होते.

Breaking News