रत्नागिरीराज्याचे उद्योग व मराठी भाषा मंत्री आणि रत्नागिरी जिल्ह्याचे पालकमंत्री ना. उदय...

राज्याचे उद्योग व मराठी भाषा मंत्री आणि रत्नागिरी जिल्ह्याचे पालकमंत्री ना. उदय सामंत ह्यांनी जाकादेवी पंचक्रोशी कुणबी विकास मंडळ यांच्याद्वारे उभारण्यात आलेल्या किसान भवन इमारतीची पाहणी केली.

या इमारतीचा सर्वसामान्य जनतेला जास्तीत जास्त लाभ मिळावा, यासाठी योग्य नियोजन करून कार्यवाही करावी, अशा सूचना ना. उदय सामंत ह्यांनी संबंधितांना दिल्या. ही इमारत स्थानिक शेतकरी व ग्रामस्थांसाठी उपयुक्त ठरेल आणि त्यांच्या उपक्रमांना बळ देईल, असा विश्वास यावेळी मा. ना. उदयजी सामंत ह्यांनी व्यक्त केला.

यावेळी संतोष तावडे, संजय किंजळे, श्रीकृष्ण उर्फ आप्पा घाणेकर जनार्दन कुळये, गुणाजी मालप, विष्णू गोताड, दत्ताराम गोताड, मनोहर गोताड, रघुनाथ गोताड, सरपंच प्रकाश खोले, सरपंच रमेश मालप, रघुनाथ डावल, हरी बंडवे, दिपक गावणकर यांसह ग्रामस्थ उपस्थित होते.

Breaking News