राष्ट्राची एकता, अखंडता व सुरक्षा अबाधित राखण्यासाठी स्वतःला समर्पित करीन ,जिल्हाधिकारी कार्यालयात सरदार वल्लभभाई पटेल व इंदिरा गांधी यांना अभिवादन; अधिकारी-कर्मचाऱ्यांनी घेतली राष्ट्रीय एकतेची शपथ
रत्नागिरी, (जिमाका): भारताचे लोहपुरुष तथा माजी उपपंतप्रधान सरदार वल्लभभाई पटेल यांच्या १५१ व्या जयंतीनिमित्त आणि माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या ४२ व्या स्मृतिदिनानिमित्त जिल्हाधिकारी कार्यालयात त्यांना भावपूर्ण आदरांजली वाहण्यात आली.
जिल्हाधिकारी कार्यालयातील सभागृहात आयोजित या कार्यक्रमात निवासी उपजिल्हाधिकारी चंद्रकांत सूर्यवंशी यांनी सरदार वल्लभभाई पटेल आणि श्रीमती इंदिरा गांधी यांच्या प्रतिमांना पुष्पहार व पुष्पांजली अर्पण करून कृतज्ञता व्यक्त केली. सरदार वल्लभभाई पटेल यांची जयंती देशभरात ‘राष्ट्रीय एकता दिवस’ म्हणून साजरी केली जाते. या दिनाचे औचित्य साधून सभागृहामध्ये निवासी उपजिल्हाधिकारी चंद्रकांत सूर्यवंशी यांनी उपस्थित सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांना राष्ट्रीय एकतेची शपथ दिली.
उपस्थितांनी “मी सत्यनिष्ठापूर्वक शपथ घेतो की, मी राष्ट्राची एकता, अखंडता व सुरक्षा अबाधित राखण्यासाठी स्वतःला समर्पित करीन आणि माझ्या देशवासियांमध्ये हा संदेश पोचविण्यासाठी देखील भरीव प्रयत्न करीन. मी ही शपथ आपल्या देशाची एकता टिकवून ठेवण्याच्या भावनेने घेत आहे जी सरदार वल्लभभाई पटेल यांच्या दूरदृष्टी व कार्यामुळे राखणे शक्य झाले आहे. तसेच मी माझ्या देशाची अंतर्गत सुरक्षा सुनिश्चित करण्याकरीता माझे स्वतःचे योगदान देण्याचा सुद्धा सत्यनिष्ठापूर्वक संकल्प करीत आहे,” असा सामूहिक संकल्प केला.
या कार्यक्रमास अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
© Copyright - Konkan24News. Website Design, Development & Maintain by SM Media. +91 96047 60330.
