विकास कामांच्या धडाक्यानंतर मोसम ता. राजापूर गावातील ग्रामस्थांचा शिवसेनेत जाहीर प्रवेश
🔵आमदार किरण सामंत यांच्या उपस्थितीत पक्षप्रवेश सोहळा उत्साहात संपन्न
राजापूर : मतदारसंघात सुरू असलेल्या विकासकामांच्या धडाक्यामुळे प्रभावित होत मोसम ता. राजापूर येथील अनेक ग्रामस्थांनी आमदार किरण सामंत यांच्या उपस्थितीत शिवसेना पक्षात जाहीर प्रवेश केला. गावात आयोजित पक्षप्रवेश सोहळा उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला असून यावेळी ग्रामस्थांनी आमदार किरण सामंत यांच्या नेतृत्वावर विश्वास व्यक्त केला.
या पक्षप्रवेश कार्यक्रमाला शिवसेनेचे पदाधिकारी, स्थानिक कार्यकर्ते, युवक तसेच ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. आमदार किरण सामंत यांनी पक्षात प्रवेश करणाऱ्या ग्रामस्थांचे स्वागत करत त्यांना शिवसेनेचा भगवा देऊन पक्षात प्रवेश दिला.
यावेळी बोलताना ग्रामस्थांनी सांगितले की, “मोसम गावासह संपूर्ण मतदारसंघात मोठ्या प्रमाणात विकासकामे सुरू आहेत. रस्ते, पूल, पाणीपुरवठा, आरोग्य सुविधा आणि विविध मूलभूत प्रश्न सोडवण्यासाठी आमदार किरण सामंत सातत्याने प्रयत्न करत आहेत. जनतेच्या प्रश्नांसाठी तत्परतेने काम करणाऱ्या नेतृत्वाच्या पाठीशी उभे राहण्याचा निर्णय आम्ही घेतला आहे.”
आमदार किरण सामंत यांनी आपल्या भाषणात सांगितले की, “शिवसेना हा सामान्य जनतेचा पक्ष आहे. विकास आणि जनसेवा हेच आमचे ध्येय आहे. मतदारसंघातील प्रत्येक गावात विकासकामे पोहोचवण्याचे काम सुरू असून नागरिकांचा वाढता विश्वास हीच आमच्या कामाची खरी पावती आहे.”
ते पुढे म्हणाले, “गावागावातील युवक, महिला आणि सर्वसामान्य नागरिक विकासाच्या विचाराने शिवसेनेत सहभागी होत आहेत. हा पक्षप्रवेश केवळ राजकीय नसून विकासाच्या प्रवाहात सहभागी होण्याचा निर्णय आहे.”
यावेळी आमदार सामंत यांनी मोसम गावातील विविध विकासकामांचा आढावा घेत ग्रामस्थांच्या अडचणी जाणून घेतल्या. तसेच आगामी काळात गावातील उर्वरित प्रश्न देखील प्राधान्याने सोडवले जातील, अशी ग्वाही त्यांनी दिली.
पक्षप्रवेशानंतर ग्रामस्थांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले असून मोसम गावात शिवसेनेची ताकद अधिक वाढल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे. विकासकामांच्या जोरावर जनतेशी नाळ जोडणारे नेतृत्व म्हणून आमदार किरण सामंत यांच्याकडे पाहिले जात असल्याची भावना यावेळी अनेक ग्रामस्थांनी व्यक्त केली
