विदर्भात पुन्हा उष्णतेची लाटेचा इशारा; हवामान विभागाचा अंदाज!
राज्यात सध्या पश्चिमी विक्षोभाची (वादळाची) स्थिती असून अनेक भागात वादळी पाऊस आणि गारपिटीची नोंद होत आहे. तर अनेक विदर्भातील बहुतांश जिल्ह्यात उष्णतेची लाटेसदृश्य परिस्थिती आहे यामुळे नागरिकांना तीव्र उन्हाचा सामना करावा लागत आहे.
राज्यात सोमवारपासून पश्चिमी विक्षोभाचा प्रभाव वाढला असला तरीही मध्य महाराष्ट्रमी, मराठवाडा आणि विदर्भात उकाडा कायम आहे. दरम्यान, पुढील चार दिवस विदर्भात उष्णतेची लाट सदृश्य परिस्थिती राहील, अशी शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे. यामुळे नागरिकांच्या समस्यांमध्ये वाढ होण्याची चिन्ह आहेत.
राज्यातील मराठवाडा, विदर्भ आणि मध्य महाराष्ट्रातील काही भागातील कमाल तापमानात लक्षणीय वाढ झाली आहे. तर दक्षिण मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यातील जिल्ह्यांमध्ये वादळी वाऱ्यासह पाऊस आणि गारपिटीची नोंदही होत आहे. पुढील चार दिवस राज्यात पश्चिमी विक्षोभाची कायम राहील, अशी शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे.
दरम्यान, सोमवारी विदर्भातील कमाल तापमानात १ ते २ अंशांची घट नोंदली गेली तर किमान तापमानात लक्षणीय वाढ झाली असून सोमवारी वर्धा येथील किमान तापमान सरासरी किमान तापमानाहून ७ अंश सेल्सिअसने अधिक नोंदले गेले. यामुळे विदर्भांत रात्रीच्या वेळी उकाड्याचा सामना नागरिकांना करावा लागत आहे.
दरम्यान, विदर्भांतील अमरावती आणि वर्धा येथे सोमवारी उष्णतेची लाटेसदृश्य परिस्थिती राहील अशी शक्यता हवामान विभागाने वर्तवली असून पुढील तीन दिवस विदर्भातील काही जिल्ह्यांना हवामान विभागाकडून उष्णतेच्या लाटेचा इशारा देण्यात आला आहे. विदर्भातील सर्वाधिक कमाल तापमानाची नोंद सोमवारी अमरावती येथे झाली. येथे ४३. ४ अंश सेल्सिअस इतके कमाल तापमान नोंदले गेले.
