रत्नागिरीविद्यार्थ्यांना दिशा देणारा एक महत्त्वपूर्ण उपक्रम – "विद्यार्थी दशा आणि दिशा"

विद्यार्थ्यांना दिशा देणारा एक महत्त्वपूर्ण उपक्रम – “विद्यार्थी दशा आणि दिशा”

पटवर्धन हायस्कूल, रत्नागिरी येथे उदय सामंत प्रतिष्ठान आयोजित “विद्यार्थी दशा आणि दिशा” या विशेष मार्गदर्शन कार्यक्रमास राज्याचे उद्योग व मराठी भाषा मंत्री आणि रत्नागिरी जिल्ह्याचे पालकमंत्री ना. डॉ उदय सामंत ह्यांनी उपस्थिती दर्शवली.

या कार्यक्रमातून विद्यार्थ्यांना त्यांच्या आयुष्याला योग्य दिशा देणारा आणि संस्कारांची प्रेरणा देणारा संदेश दिला. १६ व्या वर्षी ज्ञानेश्वर महाराजांनी ज्ञानेश्वरी लिहिली, अशोक सम्राटांनी सम्राटपदाची जबाबदारी पेलली, आणि छत्रपती संभाजी महाराजांनी इतिहास घडवला — या थोर व्यक्तींचं आयुष्य हे आपल्या विद्यार्थ्यांसाठी आदर्श ठरावं, असा विचार विद्यार्थ्यांच्या मनात रुजवण्याचा प्रयत्न करण्यात आला. हा कार्यक्रम म्हणजे केवळ माहितीचा नव्हे तर संस्कारांचाही संगम होता. शाळेतील शिक्षक हे केवळ शिक्षक नसून संस्कारवर्गाचे शिल्पकार आहेत, आणि त्यांच्याकडून मिळणं ही खूप मोठी संपत्ती आहे. याचसोबत, अमली पदार्थांपासून दूर राहणं, आपल्या कुटुंबाचं आणि समाजाचं स्वास्थ्य टिकवणं, हे देखील विद्यार्थ्यांना पटवून देण्यात आलं. अमली पदार्थांमुळे केवळ मुलंच नव्हे तर संपूर्ण कुटुंब आणि समाज बिघडतो, हे सत्य विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवण्याचं काम यावेळी करण्यात आलं.

या प्रसंगी पोलीस अधीक्षक नितीन बगाटे, शाळेचे मुख्याध्यापक, शिक्षकगण आणि १० वी चे शेकडो विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Breaking News