रत्नागिरीवैचारिक चळवळींना तात्काळ प्रतिसाद मिळत नाही

वैचारिक चळवळींना तात्काळ प्रतिसाद मिळत नाही

‘वैचारिक चळवळींना तात्काळ प्रतिसाद मिळत नाही

अण्णा भाऊ साठे यांनी शोषितांच्या वेदनांना साहित्याद्वारे आवाज दिला’- चेअरमन अभिजित हेगशेट्ये
======——-======
संगमेश्वर : लोवले येथील नवनिर्माण महाविद्यालयात मराठी वाङ्मय मंडळाच्या वतीने लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांची जयंती आणि लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांची पुण्यतिथी उत्साहात साजरी करण्यात आली.

यानिमित्त आयोजित कार्यक्रमात दोन्ही महापुरुषांच्या विचारांचा आणि कार्याचा गौरव करण्यात आला.

कार्यक्रमात नवनिर्माण शिक्षण संस्थेचे चेअरमन अभिजित हेगशेट्ये यांनी मार्गदर्शन करताना सांगितले की, “कोणत्याही वैचारिक चळवळीला तात्काळ प्रतिसाद मिळत नाही. अण्णा भाऊ साठे यांनी स्वतः अनुभवलेले वास्तव, शोषितांचे दुःख आणि वेदना आपल्या साहित्याद्वारे प्रभावीपणे मांडल्या. त्यांच्या जन्मजात प्रतिभा, सामाजिक जाण आणि सर्जनशीलतेमुळे त्यांनी शोषित, वंचित आणि कष्टकरी समाजाच्या संघर्षाचा अमूल्य साहित्यिक ठेवा निर्माण केला.”

यावेळी डॉ. संतोष खरे यांनी अण्णा भाऊ साठे यांच्या प्रेरणेचा स्रोत उलगडून सांगताना कार्ल मार्क्स आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांचा त्यांच्या साहित्यावर झालेला प्रभाव स्पष्ट केला. समाजातील उपेक्षितांच्या न्यायाच्या लढ्याला या विचारवंतांचे तत्त्वज्ञान प्रेरणादायी ठरल्याचे त्यांनी नमूद केले.

महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ. संजना चव्हाण यांनी लोकमान्य टिळक आणि अण्णा भाऊ साठे यांच्या विचारांची आजच्या काळात अधिक व्यापक जनजागृती होणे आवश्यक असल्याचे मत व्यक्त केले.

मराठी वाङ्मय मंडळाच्या वतीने आयोजित या कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा. रणसे यांनी केले. सूत्रसंचालन अनिल नेमण यांनी केले, तर पूजा प्रसाद यांनी आभार प्रदर्शन केले.

Breaking News

Metode de Depunere la Cazinou Bet365

În căutarea celor mai flexibile modalități de a investi...

Καταθέσεις στο καζίνο WinShark: Οδηγός

Πολλοί παίκτες προτιμούν να χρησιμοποιούν το casino-winshark.gr για τις...