शैक्षणिकशिक्षक संघटना समवेत शिक्षण मंत्री श्री. दादा भुसे यांची बैठक संपन्न--

शिक्षक संघटना समवेत शिक्षण मंत्री श्री. दादा भुसे यांची बैठक संपन्न–

शिक्षक संघटनासोबत झालेल्या बैठकीत खालील विषयांवर चर्चा करण्यात आली
१. अशैक्षणिक कामातून शिक्षकांची मुक्तता करणे.
२. शाळा स्तरावरील १५ समित्या रद्द करून ४ समित्यांमध्ये कार्यान्वित ठेवणे.
३. ऑनलाईन कामकाज कमी करणे.
४. विविध योजनांमधून शाळांचा पायाभूत विकास करणे.
४. संचमान्यता निकष शासन निर्णयात बदल करणे ..१५/०४/२०२४ संच मान्यता निकष शासन आदेश निकष दुरुस्ती करणे बाबत.
या विषयांवर शिक्षणमंत्री दादा भुसे यांनी संघटनांना उत्तम मार्गदर्शन केलें, सर्व संघटना पदाधिकाऱ्यांचे विचार व समस्या ऐकून घेतल्या वर त्यावर अधिकाऱ्यांना सूचना देऊन आवश्यक त्या सुधारणा करण्या संदर्भात आदेश दिले.
सदर बैठकीस कोकण विभाग शिक्षक मतदार संघाचे आमदार श्री ज्ञानेश्वर म्हात्रे उपस्थित राहून मंत्री महोदयांशी सदर विषयांवर चर्चा केली.या बैठकीसाठी शिक्षण आयुक्त श्री.सच्छिद्र सिंह , आयुक्त श्री. राहुल रेखावार, उपसचिव श्री. समीर सावंत, उपसचिव श्री.तुषार महाजन, शिक्षण संचालक श्री.संपत सूर्यवंशी , श्री.शरद गोसावी उपस्थित होते.

Breaking News