आज दुपारी उबाठे चे प्रमुख नेते विलास चाळके.राजेद्रं महाडीक रोहन बने आदी जण उप मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या प्रमुख उपस्थितीत रत्नागिरी येथील चंपक मैदानावर आयोजित जाहीर सभेत शिवसेनेत प्रवेश करणार आहेत. परंतु प्रवेश करण्यापूर्वीच माजी खासदार आणि उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते व सचीव विनायक राऊत यांनी या सर्वांची पक्षातुन हकालपट्टी केली असल्याचे पत्र प्रसिद्ध केले असल्याने राजकीय वर्तुळात एकच खळबळ माजली आहे.. दरम्यान त्यांनी आमची हकालपट्टी करण्या अगोदरच आम्ही आमच्या पदांचे रितसर राजीनामे दिले आहेत असे राजेंद्र महाडिक म्हणाले.. त्यामुळे हकालपट्टी करण्याचा प्रश्नच उदभवत नाही असेही राजेंद्र महाडिक व विलास चाळके यांनी सांगितले आहे— विलास चाळके.राजेद्रं महाडिक.रोहन बने हे माजी खासदार विनायक राऊत यांचे कट्टर समर्थक म्हणून ओळखले जात असत. परंतु आता हे सर्व जण एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश करणार असल्याने रत्नागिरी जिल्ह्यातील उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाला हा एक मोठाच धक्का असल्याचे बोलले जात आहे
© Copyright - Konkan24News. Website Design, Development & Maintain by SM Media. +91 96047 60330.