नुकताच शैक्षणिक वर्ष २०२४- २५ मध्ये झालेल्या शिष्यवृत्ती परीक्षेचा निकाल जाहीर झाला.
या वर्षी शिष्यवृत्ती परीक्षेत रत्नागिरी जिल्ह्यात एकूण 8345 विद्यार्थी सहभागी होते.
शिष्यवृत्ती परीक्षेमध्ये इयत्ता पाचवी मधून मिस्त्री हायस्कूलचा विद्यार्थी सौबान मोहियुद्दिन सय्यद या विद्यार्थ्याने जिल्हास्तरीय गुणवत्ता यादीमध्ये संपूर्ण जिल्ह्यातून शहरी विभागात पंधरावा(१५) स्थान पटकावले आहे तर संपूर्ण जिल्ह्यातून उर्दू माध्यमातुन प्रथम क्रमांक पटकावण्याचा बहुमान ही त्याने मिळविला आहे.
तसेच महाराष्ट्र राज्यातून त्याने उर्दू माध्यमातुन (शहरी ) गुणवत्ता यादीत 39 वे स्थान पटकावून दैदीप्यमान यश प्राप्त केले आहे. त्याच्या या यशाचे संपूर्ण जिल्ह्यातून कौतुक होत आहे. तसेच त्याला मार्गदर्शन करणारे सर्व शिक्षक व पालक यांचे पण अभिनंदन होत आहे.
प्रशालेच्या मुख्याध्यापिका मुनव्वर तांबोळी, पर्यवेक्षक मुश्ताक आगा, संस्थेचे अध्यक्ष अब्दुल हमीद मिस्त्री, शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष व संस्थेचे उपाध्यक्ष निसार लाला, सचिव तन्वीर मिस्त्री,सहसचिव शकील मजगांवकर, खजिनदार जाहीर मिस्त्री, सन्मानीय सदस्य रफीक मुकादम,
रियाद मिस्त्री, इकबाल मिस्त्री, साबीर मजगांवकर, आदी मान्यवरांनीही यशस्वी विद्यार्थ्यांचे व मार्गदर्शक शिक्षकांचे मनःपूर्वक अभिनंदन केले आहे. तसेच प्रशालेवर विविध शैक्षणिक आणि सामाजिक थरातून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
