शेरवल गावची 30 वर्षीय माहेरवाशीण सौ स्मिता प्रभाकर देवरे ही मरणाच्या छायेत असतानाच ; तिला परमेश्वराच्या रुपाने आलेल्या डाॅ नियती देवळेकर हिने दिले जीवदान
खेड :- तालुक्यातील आणि खाडीपट्टयातील शेरवल गावची माहेरवाशीण आणि नाशिकची सासुरवाशीण सौ. स्मिता प्रभाकर देवरे ही 30 वर्षीय महिला मृत्युच्या छायेत असतानाच मुंबई- परेल येथील केईएम रुग्णालयात सेवेत असलेली खेडची सुकन्या मज्जातंतू शास्त्रज्ञ डाॅ. नियती देवळेकर हिने आणि तिच्या सहकारी वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या पथकाने मुंबई येथील परेल येथे असणा-या केईएम रुग्णालयात यशस्वी तीन तासाची शस्त्रक्रिया करुन तिला जीवदान दिल्याची भुमिका पार पाडल्याबद्दल डाॅ. नियती देवळेकर आणि तिचे सहकारी वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या पथकावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. डाॅ नियती देवळेकर हिने आतापर्यंत कोकणातील 25/30 अशा अवघड शस्त्रक्रिया करून रुग्णांचे प्राण वाचवले आहेत. तर कोकणाच्या बाहेरच्या त्याहुन अधिक रुग्णांना वाचविले आहे. असे सांगून ही तर रुग्णसेवा हिच ईश्वरीय सेवा असल्याचे मत व्यक्त केले.
सौ. स्मिता प्रभाकर देवरे वय 32 या नवी मुंबई येथील नेरुळ येथील रुग्णालयात प्रसृती झाल्या, तिला कन्या रत्नाला लाभ झालेला असतानाच तिच्या पोटात अचानक दुखायला लागल्याने तिची तब्येत बिघडली. तेथील डाॅक्टररांना निदान करणे अवघड होत होते. तेथून ठाणे येथील अमृता या खासगी रुग्णालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले. पण तेथेही काहीच उपयोग झाला नाही. अखेर मुलीची काकी सौ. अंकिता शिगवण ही आपल्या पुतणीच्या जीव वाचविण्यासाठी पुढे आल्यावर त्यांनी डाॅ नियती देवळेकर हिच्याशी मोबाईल फोन करून संपर्क साधून घडल्याप्रकाराबाबत डाॅक्टर देवळेकर हिच्या वर्षाव संपर्क साधून माहीती देत, तिला
तातडीने केईएम रुग्णालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले डाॅ नियती देवळेकर यांनी क्षणाचाही विलंब न लावता, तात्काळ शस्त्रक्रियेची तयारी करून हिरा नंदाणी हाॅस्पीटलचे तज्ञ डाॅ. केतन कांच्छीरीया यांचेशी संपर्क साधून स्मिता देवरे हिच्या पोटातील ॲपेंडिस फुटल्याने त्याचा पल्स आतड्यांना चिकटल्यामुळे तिच्यावर अवघड आणि आव्हानात्मक अशी तीन तासाची यशस्वी शस्त्रक्रिया करून तिचा जीव वाचविण्याचा यशस्वी प्रयत्न करत, यश प्राप्त करीत सौ.
स्मिता प्रभाकर देवरे या महिलेला मरणाच्या छायेतून वाचुन जीवदान देण्याची भुमिका डाॅ नियती देवळेकर हिने बजावत महिलेला पुनर्जन्म दिला. तिच्या तब्येतीच्या सुधारणा होत असुनधोका टळलेला आहे. डाॅ नियती देवळेकर आणि तिचे सहकारी वैद्यकीय अधिकारी साक्षात परमेश्वराचा दुसरा अवतार असल्याचे बोलले जात आहे. स्मिता देवरे ही महिला वाचु शकणार नव्हती असं वैद्यकीय क्षेत्रातील जाणकारांचे म्हणणे होते. पण डाॅ. नियती देवळेकर या परमेश्वर रुपाने महिलेच्या पाठीमागे उभी राहून तिला पुनर्जन्म देत, तिला मरणाच्या छायेतून वाचविण्याची महत्त्वाची भुमिका बजावली. तिचे व सहकारी वैद्यकीय अधिकाऱ्यांचे सर्वच स्तरातून कौतुक होत आहे.
फोटो
खेड तालुक्यातील शेरवल गावची माहेरवाशीण आणि नाशिकची सासुरवाशीण सौ. स्मिता प्रभाकर देवरे ही मरणाच्या छायेत असतानाच खेडची सुकन्या मज्जातंतू शास्त्रज्ञ डाॅ. नियती देवळेकर आणि तिच्या सहकारी वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तिचे प्राण वाचवुन तिला पुनर्जन्म दिल्याबद्दल येथील सामाजिक कार्यकर्ती सौ. अंकिता शिगवण आणि कुटुंबियांनी पुष्पगुच्छ देऊन सत्कार केल्याचे छायाचित्र
शेरवल गावची 30 वर्षीय माहेरवाशीण सौ स्मिता प्रभाकर देवरे ही मरणाच्या छायेत असतानाच ; तिला परमेश्वराच्या रुपाने आलेल्या डाॅ नियती देवळेकर हिने दिले जीवदान
