रत्नागिरीशैक्षणिक वर्ष सन 2024/ 25 मध्ये घेण्यात आलेल्या राष्ट्रीय आर्थिक दृष्ट्या मागास...

शैक्षणिक वर्ष सन 2024/ 25 मध्ये घेण्यात आलेल्या राष्ट्रीय आर्थिक दृष्ट्या मागास शिष्यवृत्ती परीक्षा (NMMS) परीक्षेत माध्यमिक विद्यालय वरवडे भाग शाळा वाटद खंडाळा प्रशालेतील 1) कु. आज्ञा चंद्रकांत विचारे 2) कु . स्वरा अरविंद बारस्कर 3) कु. गौरी मंगेश मांजरेकर 4) कु. कस्तुरी किरण बैकर या विद्यार्थिनींना शिष्यवृत्ती प्राप्त झाली आहे

शैक्षणिक वर्ष सन 2024/ 25 मध्ये घेण्यात आलेल्या राष्ट्रीय आर्थिक दृष्ट्या मागास शिष्यवृत्ती परीक्षा (NMMS) परीक्षेत माध्यमिक विद्यालय वरवडे भाग शाळा वाटद खंडाळा प्रशालेतील 1) कु. आज्ञा चंद्रकांत विचारे 2) कु . स्वरा अरविंद बारस्कर 3) कु. गौरी मंगेश मांजरेकर 4) कु. कस्तुरी किरण बैकर या विद्यार्थिनींना शिष्यवृत्ती प्राप्त झाली आहे. कु. स्वरा अरविंद बारस्कर हिला केंद्र सरकारची 60 हजार रुपये तर कु.आज्ञा चंद्रकांत विचारे, कु.गौरी मंगेश मांजरेकर व कु.कस्तुरी किरण बैकर या तीन विद्यार्थिनींना सारथी संस्थेकडून (महाराष्ट्र शासन) प्रत्येकी 48 हजार रुपये शिष्यवृत्ती प्राप्त झाली आहे. या यशस्वी विद्यार्थिनींचे संस्थेचे अध्यक्ष डॉ.राजेंद्र विचारे साहेब, उपाध्यक्ष श्री.रामनाथ शेठ आढाव, सचिव श्री.समीर बोरकर , सहसचिव श्री.संदीप सुर्वे, सी.ई.ओ.श्री.बाबुशेठ पाटील ,संचालक श्री.सुभाषराव विचारे, श्री.अनिकेत सुर्वे, श्री. किशोर मोहित, श्री.तुषार चव्हाण, प्रशालेचे मुख्याध्यापक श्री.जगताप सर, पर्यवेक्षक श्री. पाटील सर, सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी अभिनंदन केले. या यशस्वी विद्यार्थ्यांना प्रशालेचे सहाय्यक शिक्षक श्री. विश्वनाथ रामचंद्र चिले व सहाय्यक शिक्षिका सौ. देवयानी कदम यांनी मार्गदर्शन केले.

Breaking News