वेरवली : वेरवली पंचक्रोशी शिक्षण मंडळ संचलित श्रीराम विद्यालय व तु. पु शेटये कनिष्ठ महाविद्यालय व का. रा. कोळवणकर यामहा ट्रेनिंग स्कूल मध्ये शैलेश रमेश डोळस विद्यानगरी नामकरण सोहळ्यानिमित्त राज्यस्तरीय रांगोळी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते.
स्पर्धेसाठी पोट्रेट (व्यक्तिचित्र) हा विषय दिला होता त्यामध्ये भारतीय खेळाडू, चित्रपट, नाट्य कलाकार, चित्रकार, शास्त्रज्ञ, राष्ट्रपुरुष प्रसिद्ध राज्यकारणे ,देवदेवता यापैकी एका विषयावर रांगोळी साकारण्याचे आव्हान स्पर्धकांसमोर होते .प्रत्येक रांगोळीत रंगसंगती ,कलात्मकता आणि संदेश देण्याची प्रभावी मांडणी दिसून आली.
या रांगोळी स्पर्धेसाठी परीक्षक म्हणून श्री किरण बेर्डे, श्री अजित गोसावी, व श्री संदीप सावंत यांनी परीक्षण केले. या स्पर्धेसाठी राज्यभरातून स्पर्धकांनी सहभाग नोंदवला. या स्पर्धेत स्पर्धकांनी थोर जागतिक कीर्तीचे शिल्पकार राम सुतार, अभिनेत्री मधुबाला, शिवाजी महाराज, संभाजी महाराज, तानाजी मालुसरे अभिनेते धर्मेंद्र व शास्त्रज्ञ ए पी जे अब्दुल कलाम तसेच विद्यानगरी नामकरण सोहळ्यानिमित्त रांगोळी स्पर्धा आयोजित केली होती ते माननीय श्रीशैलेश डोळस इत्यादी चित्रे स्पर्धकाने रेखाटली होती.
यामध्ये प्रथम क्रमांक विलास रहाटे (देवरुख) यांनी जागतिक कीर्तीचे शिल्पकार स्वर्गीय राम सुतार यांची रांगोळी रेखाटली होती तर द्वितीय क्रमांक अभिषेक सुतार (भांडुप) यांनी सुभेदार तानाजी मालुसरे तर तृतीय क्रमांक किशोर पांचाळ ( मुंबई) यांनी ऑपरेशन सिंदूर तर उत्तेजनार्थ शर्वरी धनुकार (अमरावती) यांनी छावा चित्रपटातील संभाजी महाराज हे रांगोळीतून रेखाटले होते. प्रथम क्रमांकाला रोख रक्कम 11000हजार सन्मानचिन्ह व प्रमाणपत्र ,द्वितीय क्रमांक रोख रक्कम9000 सन्मानचिन्ह प्रमाणपत्र, व तृतीय क्रमांकाला रोख रक्कम 7000 सम्मान चिन्ह व प्रमाणपत्र उत्तेजनार्थ तीन हजार सन्मान चिन्ह व प्रमाणपत्र देण्यात आले.
या बक्षीस वितरण कार्यक्रमाला शाळेचे मुख्याध्यापक माननीय श्री अरुण डोळे,अध्यक्ष मा श्री दादा डोळस, सचिव मा श्री. संतोष पडवणकर , सहसचिव श्री सुरेश चव्हाण शाळा व्यवस्थापन समितीचे सदस्य श्री विजय साळसकर श्री पंढरी गुरव श्री जयवंत जाधव श्री अमोल बोडस श्री रविंद्र शिंदे श्री सुरज कुडतडकर सर्व शिक्षक व कर्मचारी विद्यार्थी उपस्थित होते मान्यवरांच्या हस्ते बक्षीस वितरण करण्यात आले .
त्यावेळी अनेक स्पर्धकानी आपल्या मनोगतातून या संस्थेच्या उपक्रमाबाबत कौतुक केले. ही स्पर्धा दोन दिवस चालली. 27 डिसेंबरला हे रांगोळी प्रदर्शन नागरिकांसाठी खुले करण्यात आले. त्यावेळी पंचक्रोशीतील व लांजा तालुक्यातील कला रसिकांनी व नागरिकांनी रांगोळी पाहण्यासाठी उपस्थिती दर्शवली. संस्थेच्या भव्य दिव्य उपक्रमाचे राज्यभरातून कौतुक होत आहे
परीक्षक श्री गोसावी यांनी कलाकारांना मार्गदर्शन केले आणि आयोजकांचे कौतुक केले या रांगोळी स्पर्धेच्या आयोजनाची जबाबदारी विद्यालयाचे ज्येष्ठ शिक्षक प्रदीप लाड व श्रुतीक प्रभूलकर व सौ निलीमा जाधव यांनी पार पाडली. सूत्रसंचालन व आभार श्री प्रदीप लाड यांनी केले.
