महाराष्ट्रसमुद्रावर जाताय? काळजी घ्या; आज  मोठी भरती! चार मीटर उंच लाटा उसळणार!!

समुद्रावर जाताय? काळजी घ्या; आज  मोठी भरती! चार मीटर उंच लाटा उसळणार!!

मुंबई : . मुंबईत सोमवारी कोसळलेल्या मुसळधार पावसामुळे अनेक ठिकाणे जलमय झाली. दरम्यान, मंगळवारी दुपारी १२ वाजून २३ मिनिटांनी समुद्राला मोठी भरती येणार आहे. या कालावधीत सुमारे ४.८८ मीटर उंचीच्या लाटा उसळणार आहेत. तसेच, हवामान विभागाने आजही मुसळधार पावसाची शक्यता वर्तविली आहे.

मुंबईत सोमवारी पहाटेपासून मुसळधार पाऊस कोसळत होता.जोरदार पावसामुळे मुंबईतील अनेक सखल भाग जलमय झाले. तसेच, वाहतूक सेवाही विस्कळीत झाली. कार्यालयात जाण्यासाठी सकाळी निघालेल्या नोकरदारांची प्रचंड तारांबळ उडाली होती. सायंकाळनंतर पावसाचा जोर ओसरला आणि पुन्हा सोमवारी मध्यरात्री काही भागात पाऊस कोसळू लागला. दरम्यान, मंगळवारी दुपारी १२ वाजून २३ मिनिटांनी समुद्राला मोठी भरती येणार असून सुमारे ४.८८ मीटर उंच लाटा उसळण्याची शक्यता आहे. तसेच सायंकाळी ६ वाजून १३ मिनिटांनी भरतीचा जोर कमी होईल. मात्र, भरतीच्या कालावधीत जोरदार पाऊस पडल्यास मुंबईची पुन्हा तुंबई होण्याची दाट शक्यता आहे.
हवामान विभागाने मुंबईत मंगळवारी मुसळधार पावसाचा अंदाज व्यक्त केला आहे. सोमवारी बरसलेल्या मुसळधारांनी हिंदमाता, अंधेरी सब-वे, मिलन सब-वे या जलकोंडी होणाऱ्या नेहमीच्या ठिकाणांबरोबरच कधी नव्हे ते देशाचे आर्थिक केंद्र असलेली दक्षिण मुंबई जलमय झाली. पूर्व आणि पश्चिम उपनगरांसह शहरांतील सखल भाग आणि रेल्वे मार्गावर पाणी साचू लागले आणि वाहतूक मंदावली. दक्षिण मुंबईमधील कुलाबा, नरिमन पॉइंट, मंत्रालय, ओव्हल मैदान, चर्चगेट, सीएसएमटी या भागात पाणी साचले होते. पावसाळ्यात पाणी साचून मुंबईकरांची गैरसोय होऊ नये यासाठी पालिकेकडून विविध उपाययोजना करण्यात आल्या होत्या. मात्र, जुलैमधील पहिल्याच पावसात मुंबईची तुंबई झाल्याने पालिकेच्या कारभाराबाबत प्रश्न निर्माण झाले आहे.

पालिकेच्या स्वयंचलित केंद्रावर सोमवारी सकाळी ८ वाजल्यापासून ते मंगळवारी सकाळी ८ वाजेपर्यंत नोंदला गेलेला पाऊस –

मुंबई शहर- १०६ मिमी

पूर्व उपनगर- ६३ मिमी

पश्चिम उपनगर- ७२ मिमी

.

Breaking News

Как найти реальную индивидуалку в Москве

Рынок интимных услуг в Москве — это настоящие джунгли,...

Где найти проверенную индивидуалку в Москве

Московский рынок досуга за последние годы стал одновременно прозрачнее...