रत्नागिरीसांस्कृतिक कार्य संचालनालयाच्या वतीने शिवजयंती निमित्तचिपळूणमध्ये २४ फेब्रुवारीला ‘रायगडला जेव्हा जाग येते’

सांस्कृतिक कार्य संचालनालयाच्या वतीने शिवजयंती निमित्तचिपळूणमध्ये २४ फेब्रुवारीला ‘रायगडला जेव्हा जाग येते’

रत्नागिरी, (जिमाका) : छत्रपती शिवाजी महाराज यांच्या गुरुवारी होणाऱ्या जयंतीनिमित्त सांस्कृतिक कार्यक्रम साजरे करण्याबाबत सांस्कृतिक कार्य संचालनालयाने कळविले आहे. त्यानुसार, चिपळूण येथील इंदिरा गांधी सांस्कृतिक सभागृहात मंगळवार दि. २४ फेब्रुवारी रोजी सायंकाळी ७ ते ९ या वेळेत ‘रायगडला जेव्हा जाग येते’ हे नाटक होणार आहे.
छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनावर आधारित नाट्य तसेच छत्रपती शिवाजी महाराजांच्या जन्मदिनाच्या अनुषंगाने महाराजांच्या जीवनावर आधारित सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्याबाबत सांस्कृतिक कार्य संचालनालयाने आपल्या पत्रात म्हटले आहे. स्थानिक कलावंत तसेच तंत्रज्ञ यांना व्यासपीठ मिळवून देण्याचाही या कार्यक्रमाचा मुख्य उद्देश आहे.

Breaking News

बालकांच्या उज्ज्वल भविष्यासाठी मुकुल माधव फाऊंडेशनचा पुढाकार

बालकांच्या उज्ज्वल भविष्यासाठी मुकुल माधव फाऊंडेशनचा पुढाकार गोळप व फणसोपमधील...

न्यू ईरा इंग्लिश स्कूल सैतवडे येथे ‘AI तंत्रज्ञान वर्ग खोली’चे दिमाखात उद्घाटन

न्यू ईरा इंग्लिश स्कूल सैतवडे येथे ‘AI तंत्रज्ञान वर्ग...