रत्नागिरीसागरी जीवशास्त्रीय संशोधन केंद्र, रत्नागिरी येथे दिनांक ५ जून २०२६ रोजी ‘जागतिक...

सागरी जीवशास्त्रीय संशोधन केंद्र, रत्नागिरी येथे दिनांक ५ जून २०२६ रोजी ‘जागतिक पर्यावरण दिन’ निमित्त विविध कृती कार्यक्रम संपन्न

सागरी जीवशास्त्रीय संशोधन केंद्र, रत्नागिरी येथे दिनांक ५ जून २०२६ रोजी ‘जागतिक पर्यावरण दिन’ निमित्त विविध कृती कार्यक्रम संपन्न

डॉ. बाळासाहेब सावंत कोंकण कृषी विद्यापीठ, दापोली, जि. रत्नागिरी अंतर्गत झाडगाव, रत्नागिरी येथे असलेल्या ‘सागरी जीवशास्त्रीय संशोधन केंद्र’ येथे दिनांक ५ जून २०२६ रोजी ‘जागतिक पर्यावरण दिवस’ निमित्त विशेष ‘कृती कार्यक्रम’ आखण्यात आलेत. सर्वप्रथम सागरी जीवशास्त्रीय संशोधन केंद्र, रत्नागिरी च्या झाडगाव परिसर मध्ये ‘प्लास्टिक प्रदूषण मुक्ती अभियान’ अंतर्गत प्लास्टिक युक्त कचरा गोळा करण्यात आला, तसेच यावेळी वृक्षारोपण सुद्धा करण्यात आले. यानंतर ‘सागरी जीवशास्त्रीय संशोधन केंद्र, रत्नागिरी’ च्या सर्व अधिकारी आणि कर्मचारी वर्गाला संशोधन केंद्र प्रमुख डॉ. केतनकुमार चौधरी यांनी ‘पर्यावरण शपथ’ दिली.
प्लास्टिक कचरा मुक्तीचा संकल्प आणि स्वच्छता मोहीम पर्यावरण दिनाची सुरुवात केंद्राच्या परिसर आणि लगतच्या भागात राबवण्यात आलेल्या ‘प्लास्टिक कचरा संकलन’ मोहिमेने झाली. संस्थेचे अधिकारी, कर्मचारी आणि विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्तपणे सहभागी होऊन परिसरातील प्लास्टिक आणि इतर विघटन न होणारा कचरा गोळा केला. प्लास्टिकच्या वाढत्या धोक्याविषयी जनजागृती करणे हा या मोहिमेचा मुख्य उद्देश होता.
वृक्षारोपण आणि निसर्गाचे जतन स्वच्छता मोहिमेनंतर केंद्र परिसरात ‘वृक्षारोपण’ करण्यात आले. डॉ. केतनकुमार चौधरी यांच्या हस्ते आणि उपस्थित कर्मचाऱ्यांच्या उपस्थितीत स्थानिक प्रजातींच्या विविध झाडांची रोपे लावण्यात आली. केवळ झाडे लावणेच नव्हे, तर त्यांचे संगोपन करण्याची जबाबदारीही यावेळी उपस्थित सर्वांनी घेतली.
पर्यावरण शपथ ग्रहण कार्यक्रमाच्या सांगता समारंभात डॉ. केतनकुमार चौधरी यांच्या अध्यक्षतेखाली सर्व उपस्थितांनी ‘पर्यावरण शपथ’ घेतली. निसर्गाचे रक्षण करणे, प्लास्टिकचा वापर टाळणे आणि दैनंदिन जीवनात शाश्वत पद्धतींचा अवलंब करणे, अशी प्रतिज्ञा सर्वांनी केली.
यावेळी भाषणात बोलताना डॉ. चौधरी यांनी समुद्रातील वाढते प्लास्टिक प्रदूषण आणि बदलते हवामान यावर चिंता व्यक्त केली. सागरी जीवसृष्टी वाचवण्यासाठी आणि मानवाच्या चांगल्या भविष्यासाठी प्रत्येकाने वैयक्तिक पातळीवर पर्यावरण रक्षणाची जबाबदारी घेणे गरजेचे असल्याचे त्यांनी प्रतिपादन केले.
सदर कार्यक्रम यशस्वी पार पाडण्याकरीता डॉ. बाळासाहेब सावंत कोंकण कृषि विद्यापीठ, दापोलीचे आदरणीय कुलगुरू डॉ. संजय भावे, संचालक विस्तार शिक्षण डॉ. राजेश ठोकळ, संशोधन संचालक डॉ. प्रशांत शहारे तसेच सागरी जीवशास्त्रीय संशोधन केंद्र, रत्नागिरीचे वरिष्ठ वैज्ञानिक अधिकारी डॉ. केतनकुमार चौधरी यांचे विशेष मार्गदर्शन लाभले.
संयुक्त राष्ट्र पर्यावरण कार्यक्रमाद्वारे (य.एन.ई.पी.) २०२६ या वर्षासाठी “Inspired by Nature. For Climate. For Our Future.” म्हणजेच “निसर्गापासून प्रेरित. हवामानासाठी. आपल्या भविष्यासाठी.” अशी अधिकृत संकल्पना जाहीर करण्यात आली आहे. निसर्गापासून प्रेरित याचा अर्थ असा आहे की, आपण मानवनिर्मित कृत्रिम उपायांवर अवलंबून राहण्याऐवजी निसर्गाकडे पाहिले पाहिजे. निसर्गाकडे स्वतःचे संतुलन राखण्याची एक उत्तम प्रणाली आहे (उदा. जंगले, समुद्र, पाणथळ जागा). आपण निसर्गाच्या या पद्धती समजून घेऊन ‘निसर्गावर आधारित उपाय’ शोधले पाहिजेत. सध्या जगभरात ऋतू चक्र बदलत आहे, तीव्र उष्णतेच्या लाटा येत आहेत आणि हिमनद्या वितळत आहेत. पृथ्वीचे तापमान मर्यादेच्या पलीकडे जात असल्यामुळे, आता फक्त चर्चा न करता थेट ‘हवामान कृती’ करण्याची वेळ आली आहे. आज आपण जे पर्यावरण वाचवू, त्यावरच आपली पुढची पिढी आणि मानवाचे अस्तित्व अवलंबून आहे. जर आज आपण पावले उचलली नाहीत, तर येणारे भविष्य संकटात असेल. थोडक्यात, ही थीम आपल्याला “निसर्ग हा आपल्या जगण्याचा पर्याय नाही, तर तो आपल्या अस्तित्वाचा पाया आहे.” याची आठवण करून देते.
सदर कार्यक्रम यशस्वी पार पाडण्याकरीता डॉ. केतनकुमार चौधरी (वरिष्ठ वैज्ञानिक अधिकारी व विभाग प्रमुख) यांच्या अध्यक्षतेखाली डॉ. आसिफ पागारकर (प्राध्यापक), डॉ. मनोज घुघुसकर (सहाय्यक संशोधन अधिकारी), डॉ. हरिष धमगये (अभिरक्षक), प्रा. नरेंद्र चोगले व प्रा. सचिन साटम (सहाय्यक संशोधन अधिकारी), तसेच श्रीम. ए.एन. सावंत (वरीष्ठ संशोधन सहाय्यक) यांनी विशेष सहभाग नोंदविला. तसेच या कार्यक्रमात जलजीविका रत्नागिरी या संस्थेचे अधिकारी श्री चिन्मय दामले हजर होते . या कार्यक्रमाकरिता श्री. मनिष शिंदे (मत्स्यालय यांत्रिक), श्री. सुहास कांबळे (शिपाई), श्री. सचिन चव्हाण (मजूर), श्री. प्रविण गायकवाड (क्षेत्र संग्राहक), श्री. तेजस जोशी, श्री. योगेश पिलणकर, श्री. स्वप्नील आलीम, श्री. पेडणेकर व श्री. प्रशांत पिलणकर यांनी विशेष परिश्रम घेतले.

Breaking News