रत्नागिरीसावर्डे विद्यालय जिल्हास्तरीय अटल विज्ञान प्रदर्शनात प्रथम

सावर्डे विद्यालय जिल्हास्तरीय अटल विज्ञान प्रदर्शनात प्रथम

सावर्डे – शालेय शिक्षण व क्रीडा विभाग, राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद (पुणे), जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था रत्नागिरी (डायट) व Lend a Hand India यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित अटल टिंकरिंग लॅब प्रशिक्षण कार्यक्रमांतर्गत सावर्डे येथील सह्याद्री शिक्षण संस्था संचलित गोविंदराव निकम माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाने जिल्हास्तरीय विज्ञान प्रदर्शनात उल्लेखनीय कामगिरी करत प्रथम क्रमांक पटकावला आहे.
सहा टप्प्यांत प्रशिक्षण
दि. २२/०८/२०२५ ते २७/०१/२०२६ या कालावधीत सहा टप्प्यांत प्रशिक्षण राबविण्यात आले. सह्याद्री शिक्षण संस्था संचलित विद्यालयातील शिक्षकांची या प्रशिक्षणासाठी निवड करण्यात आली.
सौ. श्रेया राजशिर्के – इलेक्ट्रॉनिक्स विभाग
सौ. संचिता कदम – मेकॅनिकल विभाग
श्री. सिद्धेश जाधव – डिजिटल विभाग
या प्रशिक्षणांतर्गत इयत्ता सातवी व आठवीतील २५ विद्यार्थ्यांची निवड करण्यात आली.
जिल्हास्तरीय विज्ञान प्रदर्शन
दि. २६/०२/२०२६ रोजी जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था रत्नागिरी आयोजित शिक्षक व विद्यार्थी विज्ञान प्रदर्शन जागुष्टे हायस्कूल रत्नागिरी येथे पार पडले. या प्रदर्शनात एकूण २८ शाळांनी सहभाग नोंदविला.
विद्यालयातील विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या प्रतिकृती पुढीलप्रमाणे –
कु. सफिया माद्रे – Road Safety on Turning (इलेक्ट्रॉनिक्स)
कु. कृपा देडगे – Periscope (मेकॅनिकल)
वेदांत भुवड – Fitness App (डिजिटल लिटरेसी)
कु. प्रणव नायक व अमोघ साठे – Accident Control System for Heavy Vehicle (सामायिक प्रतिकृती)
यापैकी इलेक्ट्रॉनिक्स विभागातील कु. सफिया माद्रे हिच्या Road Safety on Turning या प्रतिकृतीने जिल्हास्तरावर प्रथम क्रमांक मिळवून सर्वांची मने जिंकली.
मार्गदर्शन व कौतुक
या सर्व विद्यार्थ्यांना श्रेया राजशिर्के, संचिता कदम, सिद्धेश जाधव व दामिनी महाडिक या शिक्षकांचे प्रभावी मार्गदर्शन लाभले.
विद्यार्थ्यांनी मिळवलेल्या या यशाबद्दल सह्याद्री शिक्षण संस्थेचे कार्याध्यक्ष शेखरजी निकम, संस्थेचे विश्वस्त मारुतीराव घाग, चंद्रकांत सुर्वे, शांताराम खानविलकर, आकांक्षा पवार, मानसिंग महाडिक, सचिव महेश महाडिक तसेच विद्यालयाचे प्राचार्य राजेंद्र वारे, उपप्राचार्य विजय चव्हाण, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी विद्यार्थ्यांचे व मार्गदर्शक शिक्षकांचे विशेष कौतुक करून पुढील स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या आहेत.
सावर्डे विद्यालयाच्या या उल्लेखनीय यशामुळे संपूर्ण परिसरात आनंदाचे वातावरण निर्माण झाले असून विद्यार्थ्यांचा आत्मविश्वास निश्चितच द्विगुणित झाला आहे.

Breaking News