रत्नागिरीसावर्डे विद्यालयाची शालांत प्रमाणपत्र परीक्षेत उज्ज्वल यशाची परंपरा कायम

सावर्डे विद्यालयाची शालांत प्रमाणपत्र परीक्षेत उज्ज्वल यशाची परंपरा कायम

सावर्डे विद्यालयाची शालांत प्रमाणपत्र परीक्षेत उज्ज्वल यशाची परंपरा कायम
सावर्डे : कोकण विभागीय मंडळ, रत्नागिरी यांच्या वतीने मार्च २०२६ मध्ये घेण्यात आलेल्या शालांत प्रमाणपत्र (इयत्ता दहावी) परीक्षेत सह्याद्री शिक्षण संस्था संचलित गोविंदराव निकम माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाने घवघवीत यश संपादन करत यशाची उज्ज्वल परंपरा कायम राखली आहे.
या परीक्षेसाठी विद्यालयातून मराठी व सेमी इंग्रजी माध्यमातील एकूण २९३ विद्यार्थी प्रविष्ट झाले होते. त्यापैकी २८८ विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून विद्यालयाचा निकाल ९८.२० टक्के इतका लागला आहे.
विद्यालयातील विद्यार्थ्यांनी उत्कृष्ट यश संपादन केले असून , स्वरा खातूने 98.20% प्रथम क्रमांक पटकावला आहे. तर शौर्य टाकसाळे 97% द्वितीय व तेजस राऊत 96% तृतीय क्रमांक मिळवून विद्यालयाच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला आहे.
तसेच विद्यार्थ्यांनी गुणवत्तेची परंपरा कायम राखत उल्लेखनीय यश मिळविले आहे. उत्तीर्ण विद्यार्थ्यांपैकी ८५ विद्यार्थ्यांनी विशेष प्रावीण्य, ११३ विद्यार्थ्यांनी प्रथम श्रेणी तर ७७ विद्यार्थ्यांनी द्वितीय श्रेणी प्राप्त केली आहे. ९० टक्क्यांपेक्षा अधिक गुण मिळविणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या देखील लक्षणीय ठरली आहे.
यशस्वी विद्यार्थ्यांचे व त्यांना मार्गदर्शन करणाऱ्या शिक्षकांचे सह्याद्री शिक्षण संस्थेचे अध्यक्ष तथा आमदार शेखर निकम, उपाध्यक्ष प्रशांतजी निकम, इसाक खतीब, युगंधराताई राजेशिर्के, कार्याध्यक्ष अनिरुद्धजी निकम, सचिव महेश महाडिक, संचालक तथा शालेय समितीचे चेअरमन शांताराम खानविलकर, संस्थेचे सर्व संचालक व पदाधिकारी, पालक-शिक्षक संघ, शालेय समिती सदस्य तसेच विद्यालयाचे प्राचार्य राजेंद्र वारे, उपप्राचार्य विजय चव्हाण, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी अभिनंदन केले आहे.
विद्यालयाच्या या यशाबद्दल सावर्डे परिसरातूनही विद्यार्थ्यांवर अभिनंदनाचा वर्षाव होत असून ग्रामस्थांकडून कौतुक व्यक्त करण्यात येत आहे.

Breaking News

Как найти реальную индивидуалку в Москве

Рынок интимных услуг в Москве — это настоящие джунгли,...

Где найти проверенную индивидуалку в Москве

Московский рынок досуга за последние годы стал одновременно прозрачнее...