रत्नागिरीसावर्डे विद्यालयात जागतिक साक्षरता दिनानिमित्त जनजागृती फेरी

सावर्डे विद्यालयात जागतिक साक्षरता दिनानिमित्त जनजागृती फेरी

सावर्डे विद्यालयात जागतिक साक्षरता दिनानिमित्त जनजागृती फेरी
‘साक्षर व्हा, प्रगत व्हा’च्या घोषणांनी परिसर दुमदुमला
सावर्डे –  जागतिक साक्षरता दिनानिमित्त सह्याद्री शिक्षण संस्था संचलित गोविंदराव निकम माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय, सावर्डे येथे विद्यार्थ्यांच्या प्रभातफेरीचे आयोजन करून साक्षरतेबाबत जनजागृती करण्यात आली.
साक्षरतेचे महत्त्व, शिक्षणाची गरज तसेच निरक्षरता निर्मूलनाचा संदेश समाजापर्यंत पोहोचविण्याच्या उद्देशाने सकाळी विद्यार्थ्यांनी हातात साक्षरतेचे संदेश असलेले फलक घेऊन प्रभातफेरी काढली. “साक्षर व्हा, प्रगत व्हा”, “शिक्षणाचा प्रसार करा, निरक्षरता दूर करा”, “शिक्षण हेच प्रगतीचे साधन आहे”, “साक्षर समाज, सक्षम समाज” अशा घोषणांनी विद्यालयाचा परिसर व परिसरातील रस्ते दुमदुमून गेले.
प्रभातफेरीदरम्यान विद्यार्थ्यांनी नागरिकांमध्ये शिक्षण व साक्षरतेचे महत्त्व पटवून देत निरक्षरता दूर करण्यासाठी सामूहिक प्रयत्नांची गरज अधोरेखित केली. शिक्षकांनीही साक्षरतेमुळे व्यक्तीच्या जीवनात होणारे सकारात्मक बदल, ज्ञानप्राप्ती आणि सामाजिक विकास याबाबत विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.
या उपक्रमातून ‘प्रत्येक व्यक्ती साक्षर आणि प्रत्येक कुटुंब शिक्षित’ असा संदेश देण्यात आला. तसेच शिक्षणाचे महत्त्व ओळखून निरक्षरता दूर करण्यासाठी प्रयत्न करण्याचा संकल्प करण्यात आला.
या प्रभातफेरीत विद्यालयाचे प्राचार्य राजेंद्र वारे उपप्राचार्य विजय चव्हाण पर्यवेक्षक महेश कुलकर्णी शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने सहभागी झाले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कुमारी स्वरा कुंभार हिने केले. संपूर्ण कार्यक्रमाचे आयोजन विद्यालयाचे शिक्षक मंगेश दाते व अनुजा बागवे यांनी केले. साक्षरतेचे महत्त्व अधोरेखित करणाऱ्या संदेशाने कार्यक्रमाचा समारोप करण्यात आला.

Breaking News