रत्नागिरीसावर्डे विद्यालयात डॉ. एस. आर. रंगनाथन जयंती व ग्रंथपाल दिन उत्साहात

सावर्डे विद्यालयात डॉ. एस. आर. रंगनाथन जयंती व ग्रंथपाल दिन उत्साहात

सावर्डे विद्यालयात डॉ. एस. आर. रंगनाथन जयंती व ग्रंथपाल दिन उत्साहात
सावर्डे : सह्याद्री शिक्षण संस्था संचलित गोविंदराव निकम माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात ग्रंथालयशास्त्राचे जनक डॉ. एस. आर. रंगनाथन यांच्या जयंतीनिमित्त तसेच ग्रंथपाल दिनाचे औचित्य साधून ‘समाजसुधारकांची ओळख’ हा उपक्रम उत्साहात आयोजित करण्यात आला.
या उपक्रमाचे उद्घाटन विद्यालयातील ज्येष्ठ शिक्षिका सौ. शिल्पा राजेशिर्के यांच्या हस्ते करण्यात आले. विद्यार्थ्यांना विविध समाजसुधारकांच्या जीवनकार्याची, विचारांची आणि सामाजिक योगदानाची ओळख व्हावी, तसेच त्यांच्यामध्ये वाचनाची आवड निर्माण व्हावी, हा उपक्रमाचा मुख्य उद्देश होता.
उपक्रमांतर्गत विद्यार्थ्यांनी विविध समाजसुधारकांची माहिती संकलित करून त्यांच्या जीवनकार्याबरोबरच समाजासाठी केलेल्या योगदानाची माहिती प्रभावीपणे सादर केली. विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवत वाचन, माहिती संकलन व सादरीकरण कौशल्यांचे दर्शन घडविले.
या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांना समाजसुधारकांच्या कार्याची प्रेरणा मिळाली. तसेच वाचनाची गोडी निर्माण होण्यासोबतच माहिती शोधणे, संकलित करणे आणि ती प्रभावीपणे मांडणे या कौशल्यांचा विकास झाला.
या कार्यक्रमाला विद्यालयाचे प्राचार्य राजेंद्र वारे, उपप्राचार्य विजय चव्हाण, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते. या कार्यक्रमाचे आयोजन ग्रंथपाल सौ अनुष्का काजरोळकर यांनी केले कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी विद्यालयातील शिक्षक व कर्मचाऱ्यांनी सहकार्य केले.

Breaking News

Καταθέσεις στο καζίνο WinShark: Οδηγός

Πολλοί παίκτες προτιμούν να χρησιμοποιούν το casino-winshark.gr για τις...

MyStake Casino : Vérification & Sécurité

La confiance est primordiale lorsqu’on joue en ligne. Dans...