रत्नागिरीसावर्डे विद्यालयात राष्ट्रीय क्रीडा दिन उत्साहात साजरा‘रन अँड राईड’ उपक्रमात २५३ खेळाडूंचा...

सावर्डे विद्यालयात राष्ट्रीय क्रीडा दिन उत्साहात साजरा‘रन अँड राईड’ उपक्रमात २५३ खेळाडूंचा उत्स्फूर्त सहभाग

सावर्डे विद्यालयात राष्ट्रीय क्रीडा दिन उत्साहात साजरा
‘रन अँड राईड’ उपक्रमात २५३ खेळाडूंचा उत्स्फूर्त सहभाग-*
👉सावर्डे : सह्याद्रि शिक्षण संस्थेच्या गोविंदराव निकम माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय, सावर्डे येथे राष्ट्रीय क्रीडा दिन विविध उपक्रमांनी उत्साहपूर्ण वातावरणात साजरा करण्यात आला. विद्यालयाचे मुख्याध्यापक राजेंद्रकुमार वारे व उपमुख्याध्यापक विजय चव्हाण यांच्या मार्गदर्शनानुसार आयोजित करण्यात आलेल्या या कार्यक्रमात विद्यार्थ्यांनी मोठ्या उत्साहाने सहभाग घेतला.
राष्ट्रीय क्रीडा दिनानिमित्त सकाळी सह्याद्रि क्रीडा संकुलावर ‘रन अँड राईड’ या विशेष उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या उपक्रमामध्ये विद्यालयातील तब्बल २५३ खेळाडूंनी उत्स्फूर्त सहभाग नोंदविला. विद्यार्थ्यांमध्ये शारीरिक तंदुरुस्ती, खेळाविषयीची आवड तसेच निरोगी जीवनशैलीबाबत जनजागृती व्हावी, या उद्देशाने हा उपक्रम आयोजित करण्यात आला होता.
यावेळी भारतीय हॉकीचे जादूगार आणि महान खेळाडू मेजर ध्यानचंद यांच्या प्रतिमेचे पूजन विद्यालयाचे पर्यवेक्षक महेश कुलकर्णी यांच्या शुभहस्ते करण्यात आले. उपस्थित शिक्षक व विद्यार्थ्यांनी मेजर ध्यानचंद यांच्या महान क्रीडा कार्याला आदरपूर्वक अभिवादन केले.
विद्यालयाचे क्रीडाशिक्षक रोहित गमरे यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना मेजर ध्यानचंद यांच्या जीवनकार्याची माहिती दिली. त्यांच्या यशामागील जिद्द, चिकाटी, कठोर परिश्रम आणि खेळाप्रती असलेली निष्ठा यांचे महत्त्व विद्यार्थ्यांना पटवून दिले. प्रत्येक विद्यार्थ्याने मेजर ध्यानचंद यांच्याप्रमाणे ध्येय निश्चित करून सातत्यपूर्ण प्रयत्नांच्या माध्यमातून यश संपादन करण्याचा प्रयत्न करावा, असे आवाहन त्यांनी केले.
या प्रसंगी विद्यालयातील इच्छा राजभर,चिन्मयी शिगवण, पृथ्वी राजभर व श्रेयश वीर या आदर्श खेळाडूंचा प्रातिनिधिक स्वरूपात सन्मान करण्यात आला. या खेळाडूंनी वर्षभरात धावणे, उंच उडी, लांब उडी यांसारख्या विविध मैदानी स्पर्धांमध्ये उत्कृष्ट कामगिरी करून विद्यालयाचे नाव उज्ज्वल केले आहे. त्यांच्या उल्लेखनीय कामगिरीबद्दल त्यांचे विशेष कौतुक करण्यात आले.
राष्ट्रीय क्रीडा दिनाच्या निमित्ताने मेजर ध्यानचंद यांच्या जीवनावर व कार्यावर आधारित माहिती देणारे आकर्षक भित्तीपत्रक विद्यालयाच्या दर्शनी भागात लावण्यात आले. या भित्तीपत्रकाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना भारतीय क्रीडा क्षेत्रातील या महान खेळाडूच्या कार्याची प्रेरणादायी माहिती मिळाली.
कार्यक्रमाचे नियोजन व यशस्वी आयोजन विद्यालयाचे क्रीडाशिक्षक दादासाहेब पांढरे, रोहित गमरे, प्रशांत सकपाळ व अमृत कडगावे यांनी केले. राष्ट्रीय क्रीडा दिनाच्या या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये क्रीडाविषयक जागरूकता निर्माण होऊन खिलाडूवृत्ती, शिस्त, संघभावना आणि निरोगी जीवनाचे महत्त्व अधोरेखित झाले.

Breaking News

Πληρωμές & Δεσμεύσεις στο Spinsy casino

Οι κυβερνο βηματα στη διαδικτυακή ντόπια επιχείρηση έχουν εξελιχθεί,...

Luna Casino: Indbetalinger og Metoder

Indbetaling er fundamentet for en god spilleoplevelse hos Luna...