रत्नागिरीसावर्डे विद्यालयात विद्यार्थ्यांना आयडियल स्टडी ॲपची भेट

सावर्डे विद्यालयात विद्यार्थ्यांना आयडियल स्टडी ॲपची भेट

गुणवत्ता विकासासाठी उपयुक्त, इयत्ता दहावीच्या 300 विद्यार्थ्यांना लाभ
पालकांचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी कटिबद्ध रहा – मनोहर महाडिक

सावर्डे प्रतिनिधी :
कोकणातील विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीसाठी सह्याद्री शिक्षण संस्था सातत्याने कार्यरत आहे. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना आधुनिक तंत्रज्ञानाची जोड मिळावी या हेतूने रोटरी क्लब ऑफ अंबरनाथ शाखेच्या वतीने सावर्डे येथील गोविंदराव निकम माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात इयत्ता दहावीच्या 300 विद्यार्थ्यांना आयडियल स्टडी ॲपचे मोफत कूपन वाटप करण्यात आले.

या प्रसंगी उपस्थित शालेय समिती सदस्य व शिक्षणप्रेमी मनोहर महाडिक यांनी विद्यार्थ्यांना प्रेरणा देत सांगितले की, “आपण सर्वांनी आपल्या पालकांची स्वप्ने पूर्ण करण्यासाठी कटिबद्ध राहिले पाहिजे. कठोर परिश्रमानेच यशाचे शिखर गाठता येते.”

कार्यक्रमाला रोटरी क्लब अंबरनाथचे अध्यक्ष पराग पाटील, प्रोजेक्ट चेअरमन मकरंद चव्हाण, पदाधिकारी मिलिंद चव्हाण, तेजस धांडे, शिरीष बेंडाले, व्यंकटेश अय्यर, आनंद मुदलियार, अरुण चोपडे, हर्ष मोकल, विसपुते यांच्या सहकार्याने ॲप वितरित कार्यक्रमाला पदाधिकारी मिलिंद चव्हाण व शिक्षण प्रेमी मनोहर महाडिक,विद्यालयाचे प्राचार्य राजेंद्र वारे, उपप्राचार्य विजय चव्हाण,तोंडली विद्यालयाचे मुख्याध्यापक सुखदेव म्हस्के,सर्व शिक्षक व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

प्राचार्य राजेंद्र वारे यांनी स्वागतपर भाषणात विद्यालयाच्या शैक्षणिक, सांस्कृतिक व क्रीडा क्षेत्रातील यशाचा आढावा घेऊन सांगितले की, आयडियल ॲप विद्यार्थ्यांच्या अभ्यासात निश्चितच उपयुक्त ठरेल. मागील शैक्षणिक वर्षातील विद्यार्थ्यांना या ॲपचा मोठा फायदा झाला होता.

रोटरी क्लबचे प्रोजेक्ट चेअरमन मकरंद चव्हाण यांनी त्यांच्या सामाजिक व शैक्षणिक उपक्रमांची माहिती दिली. यावेळी पदाधिकारी मिलिंद चव्हाण यांनी विद्यार्थ्यांना ॲप डाऊनलोड करण्याची प्रक्रिया समजावून सांगितली तसेच “शालांत परीक्षेची भीती दूर करण्यासाठी या ॲपमध्ये सविस्तर पाठ्यपुस्तक विवेचन, सराव चाचण्या, प्रश्नपत्रिका व दहावी नंतरच्या मार्गदर्शनाची सुविधा देण्यात आली आहे. विद्यार्थी मेहनतीने याचा वापर केल्यास गुणवत्तावृद्धी निश्चित होईल.” असे प्रतिपादन केले.

आकांक्षा सॉफ्टवेअर अँड प्रोग्रॅमच्या वतीने तयार केलेला हा ॲप रत्नागिरी जिल्ह्यात प्रथमच सावर्डे विद्यालयात विद्यार्थ्यांना वितरित होत असल्याचा आनंद सर्वांनी व्यक्त केला.

या कार्यक्रमाचे निवेदन अशोक शितोळे यांनी केले.
ॲप वितरण प्रसंगी पदाधिकारी मिलिंद चव्हाण, शिक्षण प्रेमी मनोहर महाडिक प्राचार्य राजेंद्र वारे व विद्यार्थी

Breaking News

साखर गावच्या श्री नवलादेवी मातेच्या शारदीय नवरात्रोत्सवाला २२ सप्टेंबरपासून प्रारंभ

राजापूर तालुक्यातील श्री नवलादेवी लक्ष्मीकेशव देवालय ट्रस्ट, साखर तर्फे...

रत्नागिरी शहरातील स्वच्छतादूतांना भाजपा माजी नगरसेवकांकडून साहित्य वाटप–

रत्नागिरी : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा वाढदिवस ते राष्ट्रपिता...