सावर्डे – सह्याद्री शिक्षण संस्था संचलित गोविंदराव निकम माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय, सावर्डे येथील HSC Vocational (Medical Lab Technician) शाखेतील इयत्ता ११ वी व १२ वीच्या विद्यार्थिनींनी प्राथमिक आरोग्य केंद्र, सावर्डे येथे शैक्षणिक भेट दिली.
या भेटीदरम्यान वैद्यकीय अधिकारी डॉ. वैष्णवी वानखडे तसेच आरोग्य सहाय्यक व आरोग्य सहाय्यिका यांनी विद्यार्थिनींना विविध आरोग्यविषयक महत्वाच्या बाबींवर मार्गदर्शन केले. प्राथमिक आरोग्य केंद्राचे कार्य, क्षयरोग व मलेरिया निदान-उपचार पद्धती, कुष्ठरोग निर्मूलन, किशोरवयीन मुलींच्या आरोग्याशी संबंधित समस्या, लसीकरणाचे महत्व, साथीचे आजार, वैयक्तिक स्वच्छता अशा विषयांची सविस्तर माहिती विद्यार्थिनींना देण्यात आली. तसेच शवविच्छेदन कक्षाची माहितीही विद्यार्थिनींना प्रत्यक्ष दाखवून समजावून सांगण्यात आली.
विद्यार्थिनींबरोबर मार्गदर्शक जगन्नाथ गावडे उपस्थित होते. या उपक्रमाबद्दल विद्यालयाचे प्राचार्य राजेंद्र वारे, उपप्राचार्य विजय चव्हाण यांनी समाधान व्यक्त करत विद्यार्थिनींच्या उत्सुकतेचे आणि आरोग्यविषयक ज्ञानवृद्धीचे कौतुक केले.
ही शैक्षणिक भेट विद्यार्थिनींसाठी अत्यंत उपयुक्त ठरल्याची प्रतिक्रिया त्यांनी व्यक्त केली.
